BMC: तुम्ही कोरोनाची घरीच टेस्ट करत असाल तर सावधान!

होम टेस्ट किट (Corona Home Test Kit) विकत घेताना आपल्याला आधारकार्ड नंबर द्यावा लागणार आहे.
BMC
BMCSaam Tv
Published On

मुंबई: तुम्ही कोरोनाची घरीच होम टेस्ट करत असाल तर सावधान! कारण मुंबई महापालिकेची तुमच्यावर नजर असणार आहे. होम टेस्ट किट हे केमिस्ट मधूनच खरेदी करण्याचं आवाहन मुंबई महापालिकेने (BMC) केले आहे. केमिस्ट मध्येच हायजेनिक टेस्ट किट मिळेल अशी माहिती महापालिकेने दिली आहे. होम टेस्ट किट कुठे आणि कोणत्या कंपनीत बनत आहे यावर राज्यसरकार बरोबर महापालिकेचीही नजर असणार असल्याचं महापालिकेने सांगितले आहे.

होम टेस्ट किट (Corona Home Test Kit) विकत घेताना आपल्याला आधारकार्ड नंबर द्यावा लागणार आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आहे की नाही किती आणि कुठून किट घेतले गेले याची माहिती ठेवता येणे शक्य यामुळे शक्य होणार आहे. पॉझिटिव्ह असलेला व्यक्ती माहिती लपण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ऑनलाईन किट विक्रीवर ही महापालिका नजर ठेवणार आहे. ऑनलाईन किट खरेदी करू नका कारण ऑनलाईन खरेदी केलेले किट हे हायजेनिक असेलच असे नाही असे आवाहन महापालिकेने केले आहे.

दरम्यान मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आणि आता मार्केटमध्ये कोरोनाची चाचणी स्वत: करण्यासाठी किट उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिक घरीच कोरोनाची चाचणी करायला प्राधान्य देत आहेत. सध्या प्रशासनाला या लोकांविषयी माहिती ठेवणं थोडं अवघड जात आहे. म्हणून मुंबई महानगरपालिकेने उचललेले हे पाऊल सकारात्मक आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com