Mumbai news  Saam tv
मुंबई/पुणे

BMC च्या सहाय्यक आयुक्तांचे निलंबन; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीला फसवल्याचा आरोप

BMC corruption cases : मुंबई क्राईम ब्रँचने १६.२ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात एफआयआर दाखल केल्यानंतर बीएमसीने सहाय्यक आयुक्तांना निलंबित केले आहे. या प्रकरणातील तपास आणि पुढील कारवाईवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Namdeo Kumbhar

मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. अभिनेता जावेद जाफरीची पत्नी हबीबा हिने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. 'के-उत्तर' विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांनी हबीबा यांची १६.२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. वांद्र्यातील एका बनावट पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणुकीचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचे समोर आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले. महेश पाटील सध्या फरार असून, गुन्हे शाखेकडून (क्राइम ब्रांच) त्यांचा शोध घेतला जात आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने महेश पाटील यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता; त्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने ही कारवाई केली. चौकशी पूर्ण होईपर्यंत पाटील यांना पदापासून दूर ठेवण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणात पोलिसांनी व्यावसायिक निशित पटेल यांना बेड्या ठोकल्या आहेत. सध्या ते पोलीस कोठडीत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हबीबा यांनी आपल्या तक्रारीत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पाटील यांनी बनावट सरकारी कागदपत्रे आणि जास्त परताव्याचे खोटे आश्वासन देऊन वांद्र्यातील पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. पाटील आणि हबीबा यांची २०२४ मध्ये पहिल्यांदा भेट झाली होती. हबीबा टॅक्सशी संबंधित कामासाठी बीएमसी (BMC) कार्यालयात गेल्या असताना ही भेट झाली. त्यावेळी पाटील यांनी हबीबा यांना सह-आरोपी निशित पटेलच्या माध्यमातून व्यवहार करण्याचा सल्ला दिला होता. गुन्हे शाखेने या प्रकरणी पटेल आणि आणखी एक आरोपी रुपेश मोरे यांना अटक केली आहे.

आरोपींनी बनावट कागदपत्रे आणि खोटी आश्वासने देऊन इतरही अनेक गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण सहा जणांविरोधात बीएनएसच्या (BNS) कलम ३१८(४), ३१९(२), ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), ३४१(१), ६१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून, आर्थिक व्यवहार, कागदपत्रे आणि गुंतवणुकीशी संबंधित पुराव्यांचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT