BMC News  Saam Digital
मुंबई/पुणे

BMC News : मुंबईतील या भागात घरोघरी जाऊन गोळा करण्यात येणार कचरा?

BMC News Update : झोपडपट्ट्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमांतर्गत आता झोपडपट्ट्यांमधील रस्ते, नाले, शौचालयांच्या स्वच्छतेबरोबर घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जाणार आहे.

Sandeep Gawade

झोपडपट्ट्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमांतर्गत आता झोपडपट्ट्यांमधील रस्ते, नाले, शौचालयांच्या स्वच्छतेबरोबर घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जाणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया पालिकेने राबवली असून चार वर्षांसाठी १४ कोटींचा खर्च केला जाणार आहे.

मुंबईत दाटीवाटीने उभ्या अनेक झोपडपट्ट्या आहेत. यात धारावीसारख्या झोपडपट्टीचाही समावेश आहे. अशा झोपडपट्ट्यांतील घनता आणि बाजारहाट पाहता येथे दिवसभर कचरा निर्माण होतो. बऱ्याचदा स्थानिक लोक आणि दुकानदार निर्माण होणारा कचरा कचराकुंड्यांमध्ये फेकतात; तर काही व्यावसायिक रात्री उशिरा कचरा फेकत असल्यामुळे कचराकुंड्या नेहमीच ओसंडून वाहतात. त्यामुळे झोपडपट्टी भागांमध्ये सतत साचलेला कचरा दिसतो. त्यामुळे विविध प्रकारची साफसफाई आणि स्वच्छता मोहीम महापालिका राबवणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सफाई कर्मचारी घरोघरी जाऊन कचरा गोळा करणार आहेत. इतकेच नाही, तर घराबाहेरील पॅसेज, नाले आणि शौचालयेही स्वच्छ केली जाणार आहेत. यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली असून चार वर्षांसाठी १३,९८,२१,३६६ कोटींचा खर्च केला जाणार आहे.

नवीन ठेकेदारांची नियुक्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झोपडपट्ट्यांच्या ‘डीप क्लिनिंग’चे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली असून स्वच्छतेसाठी ठेकेदारालाही बदलण्यात आले असून नवीन ठेकेदार नियुक्त केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीड जिल्हा कारागृहात दोन कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

Ayushman Bharat Yojana: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! आयुष्मान कार्ड तुमच्याकडे आहे का? पाहा A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT