म्हाडाने उशीरा का होईना पण आज मुंबई शहराती अतिधोकादायक जुन्या उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर केली आहे. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या केलेल्या सर्वेक्षणात २० इमारती अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर इमारतींमध्ये ४९७ निवासी तर २१७ अनिवासी गाळे आहेत.
पावसाळ्यात इमारत कोसळून अपघात झाल्यास जिवित हानी होऊ नये म्हणून म्हाडाने संबंधित रहिवाशांची पर्यायी व्यावस्था म्हाडाकडून सुरू आहे. आतापर्यंत ४६ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. तर ३६ निवासी भाडेकरूंनी स्वतःची निवासाची पर्यायी व्यवस्था केली आहे. उर्वरित इमारतींमधील भाडेकरुंना निष्कासनाच्या सूचना देण्यात आली आहे. दरम्यान ४१२ निवासी भाडेकरूंची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असल्याने मुंबई मंडळातर्फे नियोजन करण्यात आले आहे.
- इमारत क्रमांक ४-४ ए,नवरोजी हिल रोड क्र. १, जॉली चेंबर
- इमारत क्रमांक ५७ निझाम स्ट्रीट
- इमारत क्रमांक ६७, मस्जिद स्ट्रीट
- इमारत क्रमांक ५२–५८, बाबु गेणु रोड
- इमारत क्रमांक ७ खंडेराव वाडी/ २०४–२०८, काळबादेवी रोड
- इमारत क्रमांक ५२ -५२ अ, २ री डेक्कन क्रॉस रोड
- इमारत क्रमांक १२५–१२७ए, जमना निवास, खाडीलकर रोड,गिरगांव
- इमारत क्रमांक ३१४ बी, ब्रम्हांड को ऑप हौ सोसायटी, व्ही पी.रोड,गिरगाव
- इमारत क्रमांक ४१८–४२६ एस.व्ही.पी रोड,(१२४ ते १३४ए ) गोलेचा हाऊस,
- इमारत क्रमांक ८३ – ८७ रावते इमारत, जे.एस.एस.रोड,गिरगांव
- इमारत क्रमांक २१३–२१५ डॉ.डी.बी.मार्ग,
- इमारत क्रमांक ३८–४० स्लेटर रोड,
- ९ डी चुनाम लेन,
- ४४ इ नौशीर भरुचा मार्ग,
- १ खेतवाडी १२ वी लेन,
- ३१सी व ३३ए ,आर रांगणेकर मार्ग व १९ पुरंदरे मार्ग , गिरगाव चौपाटी
- इमारत क्रमांक १०४-१०६ ,मेघजी बिल्डिंग, अ , ब व क विंग , शिवदास चापसी मार्ग
- इमारत क्रमांक ५५-५९–६१–६३–६५ सोफीया झुबेर मार्ग,
- इमारत क्र. ४४-४८, ३३-३७ व ९-१२ कामाठीपुरा ११ वी व १२ वी गल्ली, देवल बिल्डींग,
- अंतिम भूखंड क्र. ७२१ व ७२४ टीपीएस - ३ विभाग, इमारत क्रमांक ४० बी व ४२८, उपकर क्र ग उत्तर ५०-९५ (१) आणि ग उत्तर -५१०३ आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ
नियंत्रण कक्ष
पावसाळ्यात इमारत अपघात घडल्यास तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाने रजनी महल, पहिला मजला, ८९-९५, ताडदेव रोड, ताडदेव, मुंबई-४०००३४ नियंत्रण कक्ष कार्यरत केला आहे. दूरध्वनी क्रमांक - २३५३६९४५, २३५१७४२३. भ्रमणध्वनी क्रमांक - ९३२१६३७६९९
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.