Diwali Firecrackers Restrictions  Saam TV
मुंबई/पुणे

Firecrackers Diwali Timing : मुंबईकरांना रात्री १० नंतर फटाके फोडण्यावर बंदी; वाचा पालिकेचे निर्बंध

BMC Limits for Firecrackers Diwali Timing : शहरात सुरू असलेलं वायू प्रदूषण लक्षात घेता ही घोषणा करण्यात आली आहे. नागरिकांनी स्वत: प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

Ruchika Jadhav

दिवाळीला सुरूवात झाली असून सर्वत्र दिव्यांचा प्रकाश आणि फटाक्यांची आतिशबाजी पहायला मिळत आहे. दिवाळीत प्रत्येक व्यक्ती विविध प्रकारचे फटाके फोडून आनंद साजरा करतात. अशात मुंबईकरांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मुंबईकरांना आता फटाके फोडायचे असतील तर ते रात्री १० च्या आतच फोडता येणार आहेत. शहरात गेल्या आठवड्यात (AQI) शुद्ध हवेची गुणवत्ता जास्त खाली घसरली. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकाने वेळेवर निर्बंध लावत रात्री १० पर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी बीएमसीने २६ प्रभागांमध्ये देखरेख पथके तैनात केली आहेत. शहरात सुरू असलेलं वायू प्रदूषण लक्षात घेता ही घोषणा करण्यात आली आहे. नागरिकांनी स्वत: प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच रात्री १० नंतर फटाके फोडू नयेत असं आवाहन पालिकेने सर्व नागरिकांना केले आहे.

रविवारी मुंबईत AQI १२६ इतकी नोंद झाली. ही नोंद मध्यम स्वरुपाची आहे. काही ठिकाणी असमाधानकारक AQI ची नोंद देखील करण्यात आली आहे.

मुंबईतील विविध शहरांतील AQI

देवनार २०४ AQI नोंदवला

भायखळ्यात १९० AQI नोंदवला

मालाडमध्ये १७३ AQI नोंदवला

माझगावमध्ये १४६ AQI नोंदवला

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC)मध्ये १४३ AQI नोंदवला

आणि बोरिवली (पूर्व) मध्ये १२८ AQI नोंदवला.

सायनमध्ये ६८ AQI समाधानकारक हवा नोंदवली गेली.

गेल्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये सुद्धा असे घडले. २०२३ मध्ये सुद्धा AQI ची कमी नोंद झाली होती. त्यावेळी सकाळी ८ ते रात्री १० याच वेळेत फटाके फोडण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.

AQI खराब कसा झाला

नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ॲडव्हान्स सायन्सेस (NIAS) चे अध्यक्ष-प्राध्यापक डॉ. गुफ्रान बेग म्हणाले की, वाऱ्याची गती कमी झाल्यामुळे AQI चा दर्जा कमी जास्त होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT