BMC News Saam Tv
मुंबई/पुणे

BMC News: 'बीएमसी'तील भांडीचोर कोण? वर्षभरात 7 हजार चमचे चोरीला, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Mumbai Latest News: 'बीएमसी'तील भांडीचोर कोण? वर्षभरात 7 हजार चमचे चोरीला

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

>> रुपाली बडवे

Bmc Latest News : मुंबईचा डोलारा सांभाळणाऱ्या मुंबई मुख्यालयाच्या उपहारगृहातून गेल्या वर्षभरात जेवणाची ताटे, चमचे, ग्लास अशी हजारो भांडी गायब झाली आहेत. पालिकेतील कर्मचारी, अधिकारी जेवण, नाश्ता आपल्या कार्यालयात मागावतात परंतु खाल्ल्यानंतर ही भांडी उपहार गृहाला परत करतच नाहीत.

कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी भांडी मागितल्यास घरातून आणल्याचे सांगितले जाते. या बनवाबनवीमुळे उपहारगृह चालक मेटाकुटीला आले असून भांडी परत करण्याचे आवाहन त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले आहे. (Latest News Update)

पालिकेतील काही कर्मचारी अधिकारी जेवण, नाश्ता आपल्या कार्यालयात मागवतात. जेवण झाल्यानंतर भांडी कार्यालयात तशीच ठेवली जातात ती परत केली जात नाहीत. त्यामुळे वर्षभरात हजारो भांडी कमी झाली असून 40 ते 50 हजारांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे थेट उपाय ग्रहाच्या समोरच्या बाजूसच भांडी घेऊन जाऊ नका ! अशी सूचना लिहली आहे.

उपहारगृहातून भांडी घेऊन जाऊ नका!

उपहारगृहातून हजारो चमचे, ताटे, ग्लास गायब झाल्याने यापुढे उपहारगृहाबाहेर भांडी घेऊन जाऊ नका असे आवाहन कर्मचारी, अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. तशी विनंती करणारा फलक कॅन्टीन मध्ये झळकवण्यात आला आहे.

ही भांडी हरवली

  • चमचे - 6 ते 7 हजार

  • लंच प्लेट - 150 ते 200

  • नाश्ता प्लेट - 300 ते 400

  • ग्लास - 100 ते 150

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल

कृष्णा नदीत सापडला 40 किलोचा महाकाय मासा; बघायला लोकांची मोक्कार गर्दी, VIDEO

विठ्ठलाच्या जागेवर बडव्यांचा दावा; 450 कोटींच्या जमिनीवरून वाद पेटला

MHADA Lottery: मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी ३ दिवस शिल्लक; कुठे अन् कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT