Navneet Rana MRI Photo
Navneet Rana MRI Photo Saam Tv
मुंबई/पुणे

लीलावती रुग्णालयाला BMCचा दणका; नवनीत राणा प्रकरणात पाठवली नोटीस

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवास्थानी हनुमान चालीसाचे पठण (Hanuman Chalisa Controversy) करू, असे आवाहन देणाऱ्या खासदार नवनीत (Navneet Rana) राणा यांची तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी लीलावती (Lilavati Hospital) रुग्णालयात उपचारही घेतले. यावेळी रुग्णालयात नवनीत राणा यांचे एमआरआयसह विविध तपासण्या होत असताना तिथली व्हिडीओ शुटींग आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोप्रकरणी मुंबई महापालिकेने लिलावती रुग्णालयाला आता नर्सिंग कायद्याखाली नोटीस बजावली ((BMC Notice To Lilavati Hospital) आहे. इतकंच नाही तर, 48 तासांत याचे उत्तर द्या असे निर्देश मुंबई महापालिकेने दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतल्या मातोश्री या निवास्थानी हनुमान चालीसा पठण करू, असं आव्हान खासदार नवनीत राणा आणि त्याचे पती आमदार रवी राणा यांनी दिले होते. त्यांच्या या आव्हानानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. मात्र शिवसैनिकांना चकमा देत राणा दाम्पत्यांनी गनिमी काव्याने मुंबईत प्रवेश केला. मुंबईत आल्यानंतर ते आपल्या खारमधील निवास्थानी थांबले. त्यानंतर मुंबईत दोन दिवस राजकीय वातावरण तापले होते. याप्रकरणी शिवसेनेकडून तक्रार दाखल झाल्यावर राणा दाम्पत्यावर कारवाई झाली. त्यानंतर दोघेही 12 दिवस तुरुंगात होते.

दरम्यान, 12 दिवसांनी जामीन मिळाल्यानंतर नवनीत राणा या लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या. मानेचा त्रास असल्याने त्यांच्यावर तिथे एमआरआय करण्यात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. या फोटो शूटला शिवसेनेने आक्षेप घेतला. MRI चे यंत्र अत्यंत संवेदनशील असल्यानं त्या खोलीमध्ये कुणालाही कॅमेरे किंवा मोबाईलचा वापर करता येत नाही. असं असतानाही राणांच्या उपचारांची शुटिंग कशी काय झाली, असा सवाल शिवसेनेनं लिलावती रुग्णालय प्रशासनाला केला आहे. सदर फोटो आणि व्हिडीओ करण्याबाबत रुग्णालय प्रशासनावर कुणाचा दबाव होता का, असाही सवाल शिवसेनेच्या नेत्यांनी विचारला.

इतकंच नाही तर, एमआरआय स्कॅन करताना फोटो व्हायरल झाल्याप्रकरणी मुंबई पालिकेच्या एच पश्चिम विभागाने लीलावती रुग्णालय प्रशासनाला नोटीस बजावली आहे. सिटीस्कॅन करताना फोटो काढणे नियमांचे उल्लंघन असल्याने ही नोटीस बजावण्यात आली असल्याचं कळतंय. या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाकडून नोटीशीला उत्तर मिळणे अपेक्षित आहे. या प्रकरणात नोटीशीला योग्य उत्तर न दिल्यास कारवाई करण्यात येईल, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | Raigad Lok Sabha : रायगडमध्ये ठाकरे आणि अजित पवार गटात लढत

Chandrashekhar Bawankule Meets Chhagan Bhujbal : बावनकुळे, भुजबळांमध्ये भेट! कारण काय?

FACT CHECK: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल! कोल्हापूरमधील व्हायरल व्हिडिओमागचं सत्य नेमकं काय?

Special Report : पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी नवा गेम प्लॅन

Today's Marathi News Live : मोदींनी दहा वर्षात काय केलं ते सांगाव; नाना पटोले यांची टीका

SCROLL FOR NEXT