लोकलची गर्दी, पाठदुखीचे खड्डे, कचराभुमीचा प्रश्न, कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, पाणी पुरवठ्याच्या समस्या सोडून भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक रंगलीय ती मुंबईचा महापौर मुस्लीम होणार का? यावर ...आणि या चर्चेला कारण ठरलंय मुंबईतील मुस्लीमांची लोकसंख्या.....
मुंबईत तब्बल 20 लाख मुस्लीम मतदार आहेत....याच मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकूण उमेदवारांपैकी 19 टक्के मुस्लीम उमेदवारांना संधी दिलीय... त्यात मुस्लीम बहुल भागात 330 म्हणजेच तब्बल 80 टक्के उमेदवार हे मुस्लीम आहेत. मात्र कोणत्या पक्षाने किती मुस्लीमांना उमेदवारी दिलीय...पाहूयात...
मुंबईत समाजवादी पक्षानं सर्वाधिक 46 मुस्लीम उमेदवारांना संधी दिलीय.. त्याखालोखाल काँग्रेसनं 37, एमआयएमनं 27, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 24, शिंदेसेनेनं 12, ठाकरेसेनेनं 10, पवारांच्या राष्ट्रवादीनं 3, मनसेनं 2, इतर पक्षांनी 57, तर मुस्लीम समाजाच्या 112 जणांनी अपक्ष उमेदवारी दिलीय.. यात भाजपनं एकही मुस्लीम समाजाला उमेदवारी दिली नाही
खरंतर मुंबईत मराठी भाषिकांची संख्या सर्वाधिक आहे.. त्याखालोखाल मुस्लीम समाजाची संख्या आहे.. मुंबईत कोणत्या भागात सर्वाधिक मुस्लीम समाजाचे मतदार आहेत...पाहूयात..
नागपाडा
भायखळा
माझगाव
माहीम
भारत नगर
बेहरामपाडा
जोगेश्वरी
मिल्लत नगर
कुर्ला
सोनापूर भांडूप
गोवंडी
चिता कॅम्प
किडवाई नगर
वडाळा पूर्व
खरंतर 2017 मध्ये मुस्लीम समाजाचे 27 नगरसेवक होते.. मात्र आता 50 प्रभागात मुस्लीम समाजाची निर्णायक भूमिका आहे.... त्यात समाजवादी पक्ष, काँग्रेस, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे मुस्लीम समाजाचा कल आहे... तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजानं ठाकरेंनाही कौल दिल्याचं दिसून आलं...आता धार्मिक धृव्रीकरण होत असताना मुस्लीम समाज ठाकरेंना साथ देणार की पारंपरिक पद्धतीनं काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि दोन्ही राष्ट्रवादीसोबत कायम राहणार यावर महापालिकेतील बहुमताचं समीकरण अवलंबून असणार आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.