भाईंदर पश्चिमेतील एका इमारतीत मराठी माणसाला घर नाकारण्यास आले आहे. भाईंदर पश्चिमेतील श्री स्कायलाइन इमारतीत मराठी आणि मासांहारी असल्याच्या कारणावरुन घर नाकारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काँग्रेस कार्यकर्ते रवींद्र खरात यांनी याबाबत आरोप केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये 'तुम्ही जर मराठी आणि नॉनव्हेज खाणारे असाल, तर तुम्हाला फ्लॅट मिळणार नाही,'असं बिल्डरच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. याप्रकरणी खरात यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे मीरा-भाईंदरमध्ये गृहनिर्माण संस्थांमधील भेदभावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.