Corona Update Saam TV
मुंबई/पुणे

Corona Update: रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता, खासगी रुग्णालयांना सज्ज राहण्याचे BMC आयुक्तांचे आदेश

मुंबईतील खासगी रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिले आहेत.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

Corona Update: मुंबई : मुंबईतील खासगी रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दिले आहेत. येत्या काही दिवसात कोरोना (Corona) रुग्णसंख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता असल्याचं आयुक्तांच म्हणणं आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत (BMC Commissioner orders to private hospitals to get ready).

मुंबईत (Mumbai) काल 10,860 कोव्हिड पॉझिटिव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आले आहेत आणि पुढील 5 ते 7 दिवसांत हा आकडा दुप्पट होण्याची शक्यता आहे. अंदाजे 10-12% रूग्णांमध्ये दररोज लक्षणे आढळतात, हे लक्षात घेता रूग्णालयातील खाटांची आवश्यकता आता झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.

झोपडपट्टी नसलेल्या भागातून 95% पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असल्याने, फक्त खासगी रुग्णालयांमध्ये खाटा शोधण्याची प्रचंड मागणी आहे. कोव्हिड जम्बो हॉस्पिटल (Jumbo Covid Hospital) आणि बीएमसी हॉस्पिटलमध्ये जाण्यास रुग्ण नाखूष आहेत.

हेही वाचा -

आयुक्तांनी असं देखील म्हटलंय की, 'माझ्या निदर्शनास आले आहे की, कोव्हिडच्या लक्षणे असलेल्या रुग्णांनी खासगी रुग्णालयात कोव्हिड बेडच्या कमतरतेच्या तक्रारी सुरु केल्या आहेत'. म्हणून सर्व खासगी रुग्णालयांना याद्वारे निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी 2021 मधील दुसऱ्या लाटेच्या शिखरावर असताना कोव्हिड रुग्णशय्या उपलब्ध करुन दिल्या होत्या त्याप्रमाणे आताही त्या कराव्या.

सर्व खासगी रुग्णालये शक्य तितक्या लवकर कोव्हिड रुग्णशय्यांची संख्या वाढवतील. 10 जानेवारी 2022 च्या आत त्या वाढवाव्याच लागतील. या संदर्भात औपचारिक आदेश आज सर्व खासगी रुग्णालयांना जारी केले जातील. BMC कर्मचारी 11 जानेवारी 2022 पासून खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यास सुरुवात करतील, जेणेकरुन प्रत्येक खासगी रुग्णालयातील कोव्हिड खाटांची संख्या पूर्वीप्रमाणे झालीये की नाही ते कळेल.

इतकेच नाही तर, प्रत्येक खाजगी रुग्णालय BMC मुख्यालय नियंत्रण कक्षात महेश नार्वेकर यांना वैयक्तिकरित्या माहिती देऊन आमच्या रियल टाइम इंटिग्रेटेड सिंगल डॅशबोर्डवर कोव्हिड रुग्णशय्या वाढलेली स्थिती अपडेट करेल. मे 2020 पासून मुंबईतील कोव्हिड महामारीच्या व्यवस्थापनात खाजगी रुग्णालयांनी अतुलनीय कामगिरी केली असल्याचं देखील आयुक्तांनी म्हटलं आहे.

"मी सर्व खासगी रुग्णालयांना नम्रपणे विनंती करतो की त्यांनी या प्रसंगाला सामोरे जावे आणि मुंबईतील नागरिकांच्या नजरेत त्यांची विश्वासार्हता जपावी. मी येथे हे देखील नमूद करु इच्छितो की दक्षिण आफ्रिकेच्या अनुभवानुसार मुंबईतील कोव्हिडची सध्याची तिसरी लाट 4-5 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे कोव्हिड महामारीच्या लढाईच्या या शेवटच्या टप्प्यात आपण प्रसंगावधान राखले पाहिजे", असं आवाहन पालिका आयुक्तांनी केलं आहे.

या सूचना मुंबईतील सर्व 142 खासगी रुग्णालयांना लागू होतील ज्यांनी मार्च ते मे 2021 दरम्यान मुंबईतील दुसऱ्या कोव्हिड साथीच्या लाटेच्या नियंत्रणात भाग घेतला होता.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT