Mumbai Power Supply: मुंबईत अनेक भागात वीज पुरवठा खंडित Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Power Supply: मुंबईत अनेक भागात वीज पुरवठा खंडित

मुंबईमध्ये बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईमध्ये बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित (Electricity failure in Mumbai) झाला आहे. मध्य आणि दक्षिण मुंबईमधील (Mumbai ) वीज पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. मुंबईतील वडाळा (Wadala), दादर, वरळी या भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उद्भवली असल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, वीज पुरवठा (Power supply) करणाऱ्या मुलुंड- ट्रॉम्बे या लाईनवर मोठ्या प्रमाणावर तांत्रिक बिघाड झाला आहे. या तांत्रिक बिघाडाने मुंबईमधील (Mumbai ) वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मागील काही तासाभरापासून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर देखील मोठ्या प्रमाणावर झाला आहे. रेल्वे सेवा सुद्धा विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकामध्ये आजून देखील वीज पुरवठा पूर्ववत झालेला नाही. यामुळे चर्चगेट स्थानकातून ट्रेन सुटण्यास अडथळे येत आहेत. रेल्वे सेवा पूर्ववत होण्याकरिता आणखी काही काळ लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WTC Final Scenario : टीम इंडियासमोरचा मार्ग काटेरी, पण अशक्य नाही! 'असं' असेल WTC फायनलचं समीकरण!

Maharashtra News Live Updates: ऊस परिषदेत राजू शेट्टी यांचा कारखानदारांना इशारा: एफआरपीसह एक रकमी ३७०० रुपये पहिली उचल द्या

Chhagan Bhujbal: 'सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच', काका-पुतण्या संघर्षावर भुजबळांचा टोला

Sushant Shingh: सुशांत सिंग प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; सीबीआयला फटकारलं

Maharashtra Election: लाडक्या बहिणींचे भाऊ कोट्यवधी; कोणत्या नेत्याची किती संपत्ती? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT