Shinde Group BJP Leader Clashes Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News : भाजप आणि शिंदे गटात दुरावा? सत्तेत असूनही मनोमिलन नाही, नेमकं कोणत्या पदावरून बिनसलं?

Kalyan latest news : कल्याण महापालिकेत भाजप आणि शिंदे गट सत्तेत असूनही मनोमिलन झालेलं दिसत नाही. दोघांमध्ये नेमकं कशावरून बिनसलं, जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

केडीएमसीचे स्थायी समिती सभापती पदावर भाजपचा दावा

भाजपच्या ठरावनंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये तणाव वाढण्याची शक्यता

पालिकेच्या महासभेत काय होणार?

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

केडीएमसीच्या स्थायी समिती सभापती पदावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद पेटण्याची शक्यता आहे. सत्तेत एकत्रित असले तरी दोघांमध्ये मनोमिलन नाही. भाजपकडून स्थायी समिती सभापती पद आम्हाला मिळावे यासाठी ठराव मंजूर करण्यात आला आहे. येत्या १६ मार्च रोजी महासभा आहे, यावर शिंदे गट सावध भूमिका घेताना दिसतेय. युतीत आहोत, जो काही निर्णय होईल, तो सामंजस्यपणाने होईल अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे.

महापालिकेच्या निवडणुका पार पडल्यावर निकाल जाहीर झाला. निकालानंतर महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली.मात्र महासभा घेतली जात नसल्याच्या मुद्यांवरून शिवसेना ठाकरे गटासह भाजप आक्रमक झाली होती. अखेर १६ मार्च रोजी महासभा घेण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. या महासभेत महापालिकेतील पक्षीय बलाबलाच्या आधारे तौलनिक संख्याबळ पाहता स्थायी समिती, महिला बाल कल्याण समिती आणि शिक्षम समितीत सदस्यांची निवड केली जाणार आहे. सदस्य निवडणूकीची प्रक्रिया पार पडल्यावर स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक जाहीर केली जाणार आहे.

१६ मार्च नंतर लगेच स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक घेतली जाणार आहे. महापौर पद शिवसेना शिंदे गटाकडे आहे. तर उपमहापौर पद भाजपकडे आहे. ही दोन्ही पदे शिंदे गट आणि भाजपच्या वाट्याला आली असली तरी भाजपने आत्ता स्थायी समिती सभापती पद आणि सभागृह नेते पदावर दावा ठोकला आहे. स्थायी समिती ही महापालिकेची तिजोरी असते. या तिजोरीच्या चाव्या भाजपला आपल्या हाती ठेवायच्या आहे. त्यामुळे भाजपने स्थायी समिती सभापती पदासाठी आग्रह धरला आहे.

भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, भाजपच्या सर्व नगरसेवकांनी मागणी केली आहे की, स्थायी समिती सभापती पद आणि सभागृह नेते पद भाजपला मिळावे. आम्ही निवडणूका युतीत लढलो. पद नाही मिळाले तर काय केले पाहिजे ? असा विषयच नाही. महायुतीच्या वाटाघाटीत भाजपला हे पद मिळेल.शिंदे गटाचे गटनेते विश्वनाथ राणे यांनी सांगितले की, भाजपने स्थायी समिती सभापती पदाची मागणी केली असली तरी दोन्ही पक्षाचे नेते याबाबत निर्णय घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

चॉकलेटचं आमिष दाखवत 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेलं, २० मिनिटांनी घरी आणून सोडलं... नराधमाचं संतापजनक कृत्य

जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा वांग्याचे कुरकुरीत काप; सोपी आणि चवदार रेसिपी!

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

मोठी बातमी ! मंत्रालयातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द, मुख्यमंत्र्यांचे आदेश

SCROLL FOR NEXT