BJP Saam TV
मुंबई/पुणे

BJP: भाजपचे मुंबईत शक्तिप्रदर्शन, महाविकास आघाडीला इशारा

'कुठल्याही लढाईने हुरळून जाऊ नका असली लढाई तर मुंबईत आहे.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निवडणूक निकालानंतर केलेल्या भाषणामध्ये भ्रष्टाचार विरुद्ध भाजपा लढणार असल्याचे संकेत दिले. इतकंच नाही तर काहीजण केंद्रीय तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला. यावरूनच महाविकास आघाडी सरकारला भाजपने इशारा दिला अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

त्याचप्रमाणे आज मुंबईत ही या निवडणूक निकाला नंतर भाजपा शक्ती प्रदर्शन करत आहे यावरून महा विकास आघाडी सरकार येणाऱ्या काही काळात अडचणीत येणार असे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आमदारांसह छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला अभिवान करण्यासाठी विधानभवनावरती गेले. आणि त्यानंतर त्यांनी आज आनंद साजरा करा मात्र उद्यापासून कामाला लागा असे आदेशही भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांना दिले.

उत्तरप्रदेश मध्ये सपाचा सुपडा साप केला. उत्तरप्रदेशमधील जनताही मोदींसोबत आहे. कुठल्याही लढाईने हुरळून जाऊ नका असली लढाई तर मुंबईत असल्याचं म्हणत त्यांनी सेनेला इशाराच दिला आहे. तसंच आम्ही कुठल्या पार्टीच्या विरोधात नाही आम्ही भ्रष्ठाचाराच्या विरोधात आहोत असंही यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

Narayan Rane : ...म्हणून मी शिवसेना सोडली; भाजप खासदार नारायण राणेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT