Ashish Shelar/ Kishori Pedanekar Saam TV
मुंबई/पुणे

भाजपच्या शेलारांनी तर सेनेच्या महापौरांनी भराडी देवीला घातलं सत्तेचं साकडं

'माझ्या भराडी देवी माते कौल दे, मुंबई महापालिकेत आमका यश यवं दे, टक्केवारी, लुटमार करतले ते हरान दे मुंबैकराची ईडापीडा टळानं दे!'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनायक वंजारे -

सिंधुदुर्ग : कोकणवासियांची अपार श्रद्धा असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी ( Anganwadi Bharadi Devi) देवीच्या जत्रेच्या निमित्ताने आज भाजपा नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) या दोघांनीही आंगणेवाडीला जाऊन दर्शन घेतले. कोकणातील राजकीय नेते आवर्जून या यात्रेत हजेरी लावून दर्शन घेत असतात ही देवी नवसाला पावणारी असल्याची श्रध्दा असल्याने देवीकडे कोणी काय मागणे मागितले यावर, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात होत असतात.

माझ्या भराडी देवी माते कौल दे, मुंबई महापालिकेत (BMC) आमका यश यवं दे, टक्केवारी, लुटमार करतले ते हरान दे मुंबैकराची ईडापीडा टळानं दे,या येळेस. 25 वर्षं भ्रष्टाचार करणाऱ्यांका घरात बसान दे चाकरमान्यांचे मुंबईत हाल करणाऱ्यांका तेंची जागा दाखन दे! माते कौल दे!!

असे साकडे घातल्याचे शेलारांनी सांगितलं शिवाय शेलारांनी मुंबई महानगर पालिकेवर गेली पंचवीस वर्ष एकचं परिवार सत्ता भोगत असून एकचं कार्यक्रम हप्ता वसुली आणि टक्केवारी करणाऱ्या दुराचारी आणि भ्रष्टाचारी व्यवस्थेला उखडून टाकण्याचं बळ मिळो असं भराडी देवी कडे साकड घातलं आहे.

मुंबईत पुन्हा भगव्याचाचं महापौर बसू दे

तर मुंबईत पुन्हा भगव्याचाचं महापौर बसू दे आणि महाराष्ट्रात पुढील पंचवीस वर्ष मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हेच राहूदेत असं साकडं किशोरी पेडणेकर यांनी देवीला घातलं आहे.

तसेच भाजप नेते आशिष शेलार यांनी दुराचारी आणि भ्रष्टाचारी व्यवस्थे पासून मुंबईला मुक्त करण्याच्या मागणीलाही उत्तर दिलं आहे. कावीळ झालेल्यांना जस सगळ जग पिवळ दिसत तसचं टक्केवारी घेणाऱ्यांनाच बरोबर टक्केवारीची भाषा कळते. टक्केवारी घेऊन जे मोठे झाले त्यांनाच टक्केवारी दिसते असं प्रत्युतर त्यांनी शेलारांना दिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये अतीवृष्टीचा बळी

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! डान्स अन् अभिनयाची आवड जोपासत केली UPSC क्रॅक; IPS श्रृती अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

Wednesday Horoscope : दिवसभरात आर्थिक चणचण भासणार, प्रेमामध्ये अपयश मिळणार; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

Gajkesri Rajyog 2025: 22 जुलैला बनणार पॉवरफुल गजकेसरी राजयोग; 'या' ३ राशींना मिळणार पैसाच पैसा

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

SCROLL FOR NEXT