Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Surabhi Jayashree Jagdish

मोबाईलची बॅटरी

मोबाईलची बॅटरी जास्त काळ चांगली ठेवायची असेल तर चार्जिंगची योग्य पद्धत माहिती असणं महत्त्वाचं आहे. मोबाईल नेहमी 100 टक्के चार्ज करणं गरजेचे आहे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. बॅटरी किती टक्क्यांपर्यंत चार्ज करावी आणि चार्जिंगची सवय कशी असावी, हे जाणून घेऊया.

Phone charging safety | saam tv

मोबाईल 100% चार्ज करणं

मोबाईल प्रत्येक वेळी 100 टक्के चार्ज करणं गरजेचं नाही. रोजच्या वापरासाठी बॅटरी साधारण 20 ते 80 टक्क्यांच्या दरम्यान ठेवणं बॅटरीच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. मात्र गरज असेल तर मोबाईल 100 टक्के चार्ज केल्याने लगेच बॅटरी खराब होत नाही.

Phone charging mistakes | saam tv

80% पर्यंत चार्ज करण्याचा फायदा

बॅटरी 100 टक्क्यांजवळ गेल्यावर चार्जिंगची प्रक्रिया वेगळी होते आणि बॅटरीवर तुलनेने जास्त ताण येऊ शकतो. त्यामुळे रोजच्या वापरात 80 ते 90 टक्क्यांपर्यंत चार्ज करणे एक चांगली सवय ठरू शकते. मोबाईल दिवसभर सहज पुरत असेल तर 100 टक्के चार्ज करण्याची गरज नसते.

Smartphone battery life | saam tv

बॅटरी 0% होईपर्यंत मोबाईल वापरू नका

मोबाईलची बॅटरी पूर्णपणे संपेपर्यंत वापरण्याची सवय टाळा. बॅटरी साधारण 20 टक्क्यांच्या आसपास आली की मोबाईल चार्जिंगला लावा. वारंवार बॅटरी पूर्णपणे रिकामी करून पुन्हा चार्ज करण्याची गरज नसते.

20 to 80 charging rule | saam tv

रात्रभर चार्जिंगला लावून ठेवावा का?

आधुनिक मोबाईलमध्ये बॅटरी 100 टक्के झाल्यानंतर चार्जिंग नियंत्रित करण्याची व्यवस्था असते. त्यामुळे एक-दोन वेळा रात्री मोबाईल चार्जिंगला राहिल्याने लगेच बॅटरी खराब होत नाही. तरीही शक्य असल्यास दीर्घकाळ 100 टक्के चार्जवर ठेवणं टाळा.

Phone battery health | saam tv

चार्जिंग करताना मोबाईल गरम होतोय का?

चार्जिंगच्या वेळी मोबाईल थोडा गरम होऊ शकतो, पण खूप जास्त तापणं योग्य नाही. चार्जिंग करताना गेम खेळणं किंवा मोबाईलवर जास्त काम करणं यामुळे हीट वाढू शकते. मोबाईल खूप गरम होत असेल तर चार्जिंग थांबवून तो थंड होऊ द्या.

Smartphone charging tips | saam tv

स्वस्त चार्जर वापरणं

मोबाईलसाठी योग्य आणि विश्वासार्ह चार्जर वापरणे महत्त्वाचे आहे. खराब दर्जाचा किंवा बनावट चार्जर वापरल्यास चार्जिंगमध्ये समस्या निर्माण होऊ शकते आणि सुरक्षिततेचाही धोका वाढू शकतो.

Smartphone battery | saam tv

CNG bike: CNG बाईकची रेंज किती? 2 किलो CNGमध्ये जाणून घ्या किती किमी धावते?

CNG bike | saam tv
येथे क्लिक करा