Maharashtra Cabinet ministry Saamtv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : शपथविधीचा मुहूर्त ठरला, दबाव टाळला; भाजपची एकनाथ शिंदेंवर कुरघोडी? पाहा स्पेशल रिपोर्ट

Eknath Shinde News : आधी मुख्यमंत्रिपद आणि त्यानंतर जास्तीची खाती पदरात पाडून घेण्यासाठी शिंदेंनी दबावतंत्र वापल्याची चर्चा रंगलीय... मात्र भाजपने नवा डाव टाकत शिंदे गटाचं दबावतंत्र फेल ठरवलंय... नेमका भाजपचा नवा डाव काय आहे? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही

मुंबई : विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी अमित शाहांसोबत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बराच खल झाला. मात्र मुख्यमंत्रिपदासह महत्वाच्या खात्यांवरून महायुतीत तिढा कायम आहे. त्यातच आता भाजपने परस्पर शपथविधीची तारीख आणि वेळ जाहीर करून एकनाथ शिंदेंकडून वापरण्यात येत असलेलं दबावतंत्र झुगारल्याची चर्चा रंगलीय.. तर शपथविधीची तारीख जाहीर करण्यावरून शिंदे गटाने भाजपला खोचक टोला लगावलाय.

छोट्या मित्रपक्षांसह भाजपची संख्या 137 वर पोहचलीय.. अजित पवारांनीही भाजपला पाठींबा दिलाय.. मात्र शिंदेंनी मुंबईतील बैठका रद्द करून दरे गावी जाण्याचा निर्णय घेत दबावतंत्र वापरल्याचं म्हटलं जात होतं. दुसरीकडे भाजपने शपथविधीची वेळ जाहीर करून शिंदेंना सूचक इशारा दिल्याचं म्हटलं जातं.

एकनाथ शिंदेंना भाजपचा सूचक इशारा

सरकारमध्ये सहभागी होण्याचा शिंदेंना भाजपकडून संदेश?

शिंदेंची गृहमंत्रिपदासह अन्य महत्त्वाच्या खात्यांची मागणी-सूत्र

गृहखातं कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही-भाजप

शिंदेंच्या दबावात येणार नसल्याचा भाजपचा सूचक इशारा?

भाजपने मुख्यमंत्रिपद जाहीर न करताच शपथविधीची तारीख जाहीर केल्याच्या मुद्द्यावर शिंदेंनी सावध प्रतिक्रीया दिलीय. शपथविधीची तारीख ठरली असली तरी दिल्लीतील बैठकीनंतरच मंत्रिपदांचं वाटप होणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय.. मात्र आता भाजपने दबावतंत्र झुगारून शपथविधीची तारीख जाहीर केल्याने हा यापुढे शिंदेंना सन्मानजनक खाती मिळणार की भाजपला मिळालेल्या बहुमतामुळे एकनाथ शिंदेंची महायुतीत फरफट होणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT