Ajit Pawar and Sharad Pawar emerge at the center of a new political equation as Shinde Sena explores alliance options ahead of civic elections. Saam Tv
मुंबई/पुणे

भाजपसोबत दुरावा, पवारांशी घरोबा? पुण्यात शिंदेसेनेसोबत दोन्ही राष्ट्रवादीची युती?

Ajit Pawar Signals New Alliance: उमेदवारी न मिळालेल्या नाराजांनी भाजपविरोधात खदखद व्यक्त केल्यामुळे भाजपची कोंडी झालीय.. त्यातच आता दोन्ही पवारांनी पॉवर गेम खेळत शिंदेंना सोबत घेण्याची रणनीती आखलीय..मात्र ही खेळी नेमकी कुठं सुरु आहे.. आणि अजित पवारांनी या नव्या समीकरणाबद्दल काय वक्तव्य केलंय..

Bharat Mohalkar

पुण्यात भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्येही पवार-काका पुतण्यांना नव्या भिडूची साथ मिळण्याची शक्यता आहे... उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपसोबतची युती फिस्कटल्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेनेची युती होण्याची शक्यता आहे... त्याबाबत अजित पवारांनी सूचक संकेत दिलेत...

खरंतर महापालिका निवडणूक जाहीर होताच भाजपनं मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करणं टाळलं. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादीसोबत युती होणार नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी अजित पवारांनी थेट काका शरद पवारांशी जुळवून घेत युती केली... त्यानंतर जागा वाटपावरुन पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप- शिंदेसेनेची युती फिस्कटली.. आणि धंगेकरांनी थेट अजित पवारांचं कार्यालय गाठत चर्चा केली...

दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंतांशी चर्चा सुरु करत भाजपविरोधकांची मोट बांधलीय... त्यामुळे 2017 मध्ये भाजपनं जिंकलेला पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला अजित पवार शिंदेसेना आणि पवारांच्या मदतीने खेचून आणणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब? राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याणमध्ये मोठी राजकीय घडामोड; दोन दिग्गज नेत्यांची एकत्र बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

Ladki Bahin eKYC: थर्टी फर्स्टची डेडलाईन तरी ई-केवायसी सुविधा सुरूच; लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक घोळ?

Friday Horoscope : नव्या वर्षाचा पहिला शुक्रवारी ठरेल लकी; जुळणार प्रेमाच्या रेशीम गाठी, ५ राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT