Sena Vs BJP: यशवंत जाधव यांच्या घराबाहेर भाजपची बॅनरबाजी - Saam TV
मुंबई/पुणे

Sena Vs BJP: यशवंत जाधव यांच्या घराबाहेर भाजपची बॅनरबाजी

शिवसेना नेते यशवंत जाधव यांची पोल खोल, अशा आशयाचे बॅनर भारतीय जनता युवा मोर्चाने जाधव यांच्या घरासमोर लावले आहेत

सुमित सावंत

मुंबई - मुंबईत सेना भाजप यांच्यातला वाद वाढण्याची शक्यता आहे. कारण प्राप्तिकर खात्याच्या करवाईला सामोरे जावे लागलेले माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घराबाहेर भाजपने बॅनरबाजी केली आहे. (BJP Targets Shivsena Again in Mumbai)

फेब्रुवारी महिन्यात प्राप्तिकर खात्याने जाधव यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यापूर्वी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लाॅंड्रिंगचा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा भाजपने (BJP) जाधव यांच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेना (Shivsena) नेते यशवंत जाधव यांची पोल खोल, अशा आशयाचे बॅनर भारतीय जनता युवा मोर्चाने जाधव यांच्या घरासमोर लावले आहेत. "यशवंत जाधव यांनी कोरोनाच्या काळात या इमारतीत ३८ घरे विकत घेतली आहेत, कोविड काळात जेव्हा मुंबईकर ऑक्सिझन आणी औषधाच्या अभावी आपले प्राण गमवत होते त्यावेळी शिवसेना नेते यशवंत जाधव एका मागे एक तब्बल ३८ घर घेण्यात व्यस्त होते. एवढ्या पैशांत अनेक मुंबईकरांचे प्राण वाचू शकले असते," असे या बॅनरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे स्व. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

फलटणच्या डॉक्टर महिलेला कोण प्रेशराइज करत होतं; साम टीव्हीच्या हाती लागलेल्या त्या पत्रात खळबळजनक माहिती

...तर फलटणच्या डॉक्टर महिलेचा जीव वाचू शकला असता

जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणी अपडेट, केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या अडचणी वाढणार? चेंडू थेट पंतप्रधानांच्या कोर्टात

SCROLL FOR NEXT