Chandrakant Patil news  saam tv
मुंबई/पुणे

Chandrakant Patil News : चंद्रकांत पाटलांवर शाईफेकीनं भाजप संतापला; पोलीस ठाण्यातच...

भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

गोपाल मोटघरे

Chandrakant Patil News : भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक फेकणाऱ्या हल्लेखोरावर कारवाईच्या मागणीसाठी चिंचवड पोलीस स्टेशनात दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे हल्लेखोर मनोज गरबडे याच्या समर्थनातही काही कार्यकर्ते पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत. त्यामुळे चिंचवड पोलीस स्टेशनात काही काळ तणाव पाहायला मिळाला. (Latest Marathi News)

चंद्रकांत पाटील यांच्यावर यांच्यावर शाई हल्ला करणाऱ्या मनोज गरबडे या तरुणाच्या बचावासाठी जमाव दाखल झाला आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते.

शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडेला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करत होते. याला विरोध करण्यासाठी काही वेळातच चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते दाखल झाले.

चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते दाखल झाल्यानंतर चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या तणावाचं वातावरण निर्माण झालं. चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, अखेर चिंचवड पोलिसांनी सर्व जमावाला शांतपणे विनंती करत पांगवून लावलं आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही फेकणाऱ्या कार्यकर्त्यांवर जर पोलीस गून्हे दाखल करत असतील तर, महापुरुषांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी पिंपरी चिंचवडमधील आंबेडकरी विचाराचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : ठाकरेंची युती होताच एकनाथ शिंदेंनी गिअर बदलला! मंत्री, आमदारांसह १२ नेत्यांना निवडणूक आखाड्यात उतरवलं

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे कोथरूडचे ब्लॉक अध्यक्ष विजय खळदकर अजित पवार यांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपमध्ये अंतर्गत राडा का झाला? आयारामांचा प्रवेश की आणखी काही...

Body Lotion: बॉडी लोशन खरेदी करताना 'या' गोष्टींची नक्की काळजी घ्या

Shiv Sena-MNS Seat Sharing: पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना-मनसे किती जागा लढवणार? फॉर्म्युल्याची आतली बातमी फुटली

SCROLL FOR NEXT