Sanjay Raut/Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

भाजपाने एका व्यंगचित्रकाराचा गळा घोटला; संजय राऊतांचे टीकास्त्र

कोणी कितीही भोंगे वाजवले तरी शिवसेनेला (Shivsena) फरक पडत नाही. मशिदीवरील भोंग्यांच्या राजकारणामुळे आज हिंदुंना देखील त्रास होतोय.

जयश्री मोरे

मुंबई : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे आधी प्रसिद्ध व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले. बाळासाहेबांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे मारले, त्यांना कोणत्याही भोंग्याची गरज लागली नाही. बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्र कला पुढे जाईल असा आम्हाला वाटलं होतं. मात्र, दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाने त्या व्यंगचित्र कलेचा गळा घोटला आहे. असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंसह भाजपवर निशाणा साधला. जागतिक व्यंगचित्रकला दिनाचं निमित्त साधत ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले, कोणी कितीही भोंगे वाजवले तरी शिवसेनेला (Shivsena) फरक पडत नाही. मशिदीवरील भोंग्यांच्या राजकारणामुळे आज हिंदुंना देखील त्रास होत असल्याने लाखो हिंदुंनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक मंदिरांमध्ये काकड आरती होऊ शकलेली नाही. त्यामुळे राज यांनी सुरू केलंलं मशिदीवरील भोंग्यांचं राजकारण हिंदुंच्याच गळ्याशी आलं असल्याचंही राऊत म्हणाले.

हे देखील पाहा -

दरम्यान, संघटनात्मक बांधणीसाठी आम्ही दौरे करतो, कालच्या ज्या प्रकारचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे त्यानुसार १८ महानगरपालिकांच्या निवडणूका तात्काळ घेण्याच्या सूचना असून त्यासाठीची पूर्वतयारी ही चालूच होती. मात्र आता वेगाने पावले टाकावी लागतील. जे कार्यक्रम पूर्वनियोजित आहेत ते आम्ही करत आहोत. १४ तारखेला बीकेसीमध्ये शिवसेनेची मोठी सभा आहे. त्यानंतर संभाजीनगरला ८ तारखेला सभा आहे त्याची तयारी सुरू असल्याचंही राऊत यांनी सांगितलं.

बाळासाहेबांची व्यंगचित्रकला राज ठाकरेंच्या माध्यमातून पुढे जाईल असं वाटलं होतं पण भाजपानं राज ठाकरेंमधील कलेचा गळा घोटला, असा टोला राऊतांनी राज यांच्यासह भाजपला लगावला. तसंच जेव्हा सोशल मीडिया, टेलिव्हिजन नव्हते त्याकाळी व्यंगचित्रकारांची ताकद होती. शंभर संपादकीयमध्ये जी ताकद नाही ती एका कार्टुनमध्ये होती असही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT