Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Saam tv
मुंबई/पुणे

Chandrashekhar Bawankule : 'पापी औरंग्याला मी कशाला जी म्हणू?' चंद्रशेखर बावनकुळे यांची वक्तव्यानंतर सारवासारव

साम टिव्ही ब्युरो

ChandraShekhar Bawankule News : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना 'औरंगजेबजी' असं वक्तव्य केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं. बावनकुळे यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. यानंतर बावनकुळे यांनी पापी औरंग्याला मी कशाला जी म्हणू? असा सवाल करत त्या वक्तव्यावर ट्वीट करत स्पष्टीकरण दिले आहे. (Latest Marathi News)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना औरंगाजेबचा 'औरंगाजेबजी' असा उल्लेख केला. त्यानंतर विरोधकांनी बावनकुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे ट्विट करत म्हणाले, 'क्रूरकर्मा, पापी औरंग्याने छत्रपती श्री संभाजी महाराज यांना हालहाल करून त्यांचे प्राण घेतले. औरंग्याने काशी विश्वेश्वराचे मंदिर फोडले. अशा नीच, क्रूरकर्म्याला मी स्वप्नातही ' जी ' म्हणू शकत नाही. औरंग्या तो पापी औरंग्याच'.

'क्रूरकर्म्या औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करत असताना, पत्रकाराने हिंदीतून प्रश्न विचारला. या प्रश्नाला हिंदीतून उत्तर देत असताना मी ‘जितेंद्र आव्हाड हे औरंगजेबजी ला क्रूर मानत नाहीत‘असे उपरोधाने म्हटले. क्रूरकर्मा औरंग्या हा आव्हाड यांच्यासाठी ‘ जी‘ आहे, असे मला म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले.

'पापी औरंग्याला मी कशाला जी म्हणू? यातील उपरोध जर या लोकांना कळत नसेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढे कमीच आहे.आमच्या पक्षाची औरंग्याबाबतची भूमिका सर्वांना ठावूक आहे. औरंग्या राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रद्धास्थान आहे हे आव्हाड्यासारख्यांनी अनेकदा सिद्ध केले आहे. आम्हाला नसत्या शब्दच्छलात अडकवून स्वतः ला शुद्ध व स्वच्छ असल्याचे दाखवू नका. औरंग्याचे आणि तुमचे नाते जगाला ठाऊक आहे, असेही पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : कोल्हापूरमध्ये मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या वृध्द मतदाराचा मृत्यू

Sambhajinagar News : संभाजीनगरात ड्रग्स, गुटख्यासह ७७ लाखांची दारू जप्त; आचारसंहितेची सुरुवात झाल्यापासूनची कारवाई

Kolhapur Election: हळहळ! मतदान केंद्राबाहेरच वृद्धाला हृदयविकाराचा झटका, रांगेतच सोडला जीव

Gujrat News: अजब गजब... गणितात २०० पैकी २१२ अन् भाषेत २११ गुण; मुलीचं मार्कशीट व्हायरल

PM Narendra Modi: ...तर तुम्ही तुमच्या मुलाचं भविष्य खराब करताय!; PM मोदींनी मुस्लिम बांधवांना केलं सावध

SCROLL FOR NEXT