'उद्धव ठाकरेंना सांगणार; भाजप शिवसेनेनं एकत्र यायला हवं, दुश्मनी मिटवायलाच हवी' Saam TV
मुंबई/पुणे

'उद्धव ठाकरेंना सांगणार; भाजप शिवसेनेनं एकत्र यायला हवं, दुश्मनी मिटवायलाच हवी'

'उद्धव ठाकरेंना हेच सांगणार की ही दुश्मनी मिटवली पाहीजे. दोस्त दोस्त ना रहा ही परिस्थिती आहे. माझी उद्धव ठाकरेंना विनंती वाद मिटवावाच पण भाजप सेना यांना एकत्र यावं.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी -

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (CM Uddhav Thackeray and CM Chandrasekhar Rao) यांची आज मुंबईत भेट झाली आहे या भेटीबाबत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले 'ते येऊन भेटातात तर उद्धव ठाकरेंनीही भेटावं तिसरी आघाडी झाली तरी त्याचा काही फरक पडणार नाही. आमचं सरकार मजबूत आहे.' असं आठवले म्हणाले.

ते पुढे म्हणाले, नेत्यांनी शिवराळ भाषा वापरु नये, महाराष्ट्राचे नुकसान होतंय. शिवाजी महाराजांच्या काळात मॅनेजमेंट होती. ठाकरे सरकारचं मॅनेज करण्याचं काम चालू असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच ओबीसी आरक्षण मिळावं. कोर्ट सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर महापालिका निवडणूकांबाबत- चंद्रकांत दादा अंदाजे बोलले असतील असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची पाठराखण केली.

दरम्यान, 'आपण उद्धव ठाकरेंना हेच सांगणार की, ही दुश्मनी मिटवली पाहीजे, दोस्त दोस्त ना रहा ही परिस्थिती आहे. माझी उद्धव ठाकरेंना विनंती आहे, वाद मिटवावाच पण भाजप सेना यांना एकत्र यावं आणि महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवा.' असंही आठवले म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT