Mumbai Bank  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Bank : महाविकास आघाडीला मोठा धक्का; भाजपची खेळी ठरली यशस्वी

भाजप आणि शिंदे गट एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. या सत्तांतरानंतर आता सत्तेची गणिते बदलण्यास सुरुवात झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेतील (ShivSena) ४० आमदारांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झाले. भाजप आणि शिंदे गट एकत्र येत सत्ता स्थापन केली. या सत्तांतरानंतर राज्यातील सत्तेची गणिते बदलण्यास सुरुवात झाली आहे. आता मुंबई बँकेतही महाविकास आघाडीला धक्का बसणार आहे. वरहूी भाजपची सत्ता येणार असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई बँकेच्या उद्या पार पडणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम होणार आहे. या निवडीत भाजपचे (BJP) आमदार प्रविण दरेकर पुन्हा मुंबई बँकेचे अध्यक्ष होणार असल्याचे बोलले जात आहे.

भाजप आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) पुन्हा बँकेचे अध्यक्ष होणार असल्याचे बोलले जात आहे. सिद्धार्थ कांबळे यांनी गेल्या आठवड्यात अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तर विठ्ठल भोसले यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. प्रवीण दरेकर यांचे अवघ्या सहा महिन्यांत मुंबई बँकेच्या अध्यक्ष पदावर पुनरागमन होणार आहे.

गेल्या एक महिन्यापासून राज्यात राजकीय नाट्य सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्रीपदाची एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली. त्यामुळे आता राज्यातील समीकरणे बदलण्यास सुरूवात झाली आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काही दिवसात होणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने बंडखोर आमदारांच्या विरोधात सर्वाच्च न्यायालयात शिवसेनेने याचिका दाखल केली आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट विरुद्ध शिवसेना वादावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महत्वाची सुनावणी पार पडली. कोर्टाने दोन्ही गटाचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता पुढील सुनावणी येत्या सोमवारी म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांना एक मोठा दिलासा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT