Devendra Fadnavis  saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political News: राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपच्या ट्विटचा अर्थ काय?

Maharashtra Political News: भाजपच्या या ट्विटमुळे राज्यातील राजकारण राजकीय भूंकप पाहायला मिळेल काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Vishal Gangurde

Maharashtra Political News:

भारतीय जनता पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'मी पुन्हा येईन' अशी कविता म्हणतानाचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. भाजपच्या या ट्विटमुळे राज्यातील राजकारण राजकीय भूंकप पाहायला मिळेल काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या दौऱ्यावर होते. तर दौऱ्याबाबत अजित पवारांनी मला विचारून दिल्लीला गेले नाही, माहिती घेतो आणि बोलतो,अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर भाजपने आज सूचक ट्विट केलं आहे.

भाजपने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये 'मी पुन्हा येईन' अशी कविता देवेंद्र फडणवीस म्हणत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Political News

भाजपच्या व्हिडिओमध्ये काय आहे?

देवेंद्र फडणवीस या व्हिडिओमध्ये म्हणालेत की,' शेवटी एवढंच सांगतो. मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन. याच निर्धारानं ,याच भूमिकेत. याच ठिकाणी नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी. गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, मी पुन्हा येईन'. दरम्यान, भाजपच्या व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपने तो व्हिडिओ ट्वीटरवरून डिलीट केला आहे.

दरम्यान, भाजपच्या ट्विटवर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी भाष्य केलं. केशव उपाध्ये म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस यांचे विचार या व्हिडिओ माध्यमातून शेअर करण्यात आले. यात दुसरे कोणतेही राजकारण शिजत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सांगितले आहे की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असणार आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

SCROLL FOR NEXT