मुंबई: भाजपाच्या वतीने महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी पोलखोल अभियानाची (BJP Polkhol Abhiyan) सुरुवात करण्यात आली आहे. चेंबूर कॅम्प येथील भाजपा कार्यालयात विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या हस्ते आणि आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या उपस्थितीत या रथ यात्रेची सुरुवात होणार होती. परंतु रथयात्रेच्या आदल्या रात्री अज्ञात इसमाने त्या रथाची (वाहनाची) तोडफोड करत नुकसान केले आहे. (BJP Polkhol campaign chariot vandalized by unknown persons; pravin darekar warns to agitation)
हे देखील पहा -
महाविकास आघाडी सरकारने केलेल्या विविध गैरव्यवहाराबाबत पोलखोल अभियान रथ यात्रेची सुरुवात होणार होती. परंतु अज्ञात व्यक्तीने रथाच्या समोरच्या बाजूस इजा केल्यामुळे, हा हल्ला नेमका कोणी केला? याबाबत शंका निर्माण होत आहे. आज यात्रा अभियानाची सुरुवात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यातच काल रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी गाडीची काच फोडली आहे. याला पोलिसांनी संरक्षण का दिलं नाही. जर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर या ठिकाणी भाजपचे सगळे नेते एकवटतील आणि जनतेच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला.
दरम्यान कांदिवली पूर्व भाजपाच्या पोलखोल अभियान सभेवरून वाद निर्माण झाला आहे. शिवसेना शाखेजवळ सभा न घेता ठिकाण बदलावे अशी विनंती पोलिसांनी भातखळकराना केली. पोलखोल सभेसाठी संध्याकाळी सुधीर मुनंगटीवार जाणार होते. मात्र त्या आधीच जागेवरून वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी अतुल भातखळकर हे पोलीस स्टेशनला जाणार आहेत.
भाजपच्या पोलखोल रथाची तोडफोड केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले की, पोलखोल रथ यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. मुंबई पालिकेत 3 लाख कोटींच्या आसपास भ्रष्टाचार झाला आहे. तुमची पोलखोल मुंबईकरांसमोर मांडतोय असं म्हणत त्यांनी सेनेला खुणावलं. तसेच गुंड प्रवृत्ती अभियान दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, शिवसेनेचा हात यात आहे की काय असा संशय आहे व्यक्त करत रथाची तोडफोड करणाऱ्या आरोपीला पकडलं नाही तर पोलीस स्टेशनला येऊन ठिय्या आंदोलन करणार असा इशारा दरेकरांनी दिला आहे. उद्या सीसीटीव्ही गायब झालं असं सांगतील म्हणून आत्ताच अर्ध्या तासात आरोपीला शोधा नाहीतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन करणार. दंडेलशाहीला दंडेलशाहीनेच उत्तर द्यायची वेळ यांनी आणू नये. हा शिवसेनेचा डाव आहे, भ्रष्टाचार समोर येईल अशी भीती त्यांना आहे असा टोला दरेकरांनी लगावला आहे.
कायदा सुव्यवस्थेवर लक्ष द्या. पण मुंबई पोलिसांची प्राधान्यताच वेगळी दिसतेय. राजकीय कार्यक्रम, इफ्तार पार्ट्या यातच ते दंग दिसतात अशी टीका त्यांनी मुंबई पोलिसांवर केली. पोलखोल यात्रेत जर काही झालं तर पोलीस जबाबदार असतील असं म्हणत कायदा सर्वांना समान धर्मस्थळ कोणाचीही असो नियम ते नियम असं दरेकर म्हणाले. लोकांना त्रास होऊ नये असा मध्यम मार्ग काढावा. असं आवाहन दरेकरांनी केलं आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.