Protesters raising slogans outside BJP office in Pune amid political controversy over historical remarks Saam Tv
मुंबई/पुणे

भाजप कार्यालयाबाहेर ‘टिपू सुलतान झिंदाबाद’च्या घोषणा अन्...;

Tipu Sultan Slogans Outside BJP Office In Pune: पुण्यात भाजप कार्यालयाबाहेर टिपू सुलतान झिंदाबादच्या घोषणांमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून राजकीय वाद पेटला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

Omkar Sonawane

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी दोन दिवसांपूर्वी टिपू सुलतानची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत केल्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. यामुळे भाजपने राज्यभर जोरदार आंदोलन करत सपकाळ यांच्या विधानाचा निषेध केला. आज सपकाळ यावर दिलगिरी व्यक्त केली. मात्र त्यानंतर पुणे शहरात आज अचानक झालेल्या घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मास मूवमेंट संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयाजवळ ‘टिपू सुलतान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याने परिसरात गोंधळ उडाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी टिपू सुलतान यांचा फोटो हातात घेऊन घोषणाबाजी केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावांच्याही घोषणा देण्यात आल्या. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?

मी पुन्हा एकदा स्पष्ट आणि ठामपणे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही. टिपू सुलतानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इंग्रजाविरूद्ध लढा दिल्याचे मी म्हटले होते. त्यांच्या योगदानाची नोंद घेत थेट भारताच्या संविधानामध्ये देखील त्यांची तसबीर आहे, संदर्भात समाजात तणाव वाढू नये, सर्वांनी परस्पर सन्मान आणि बंधुभाव जपावा, हा माझ्या वक्तव्याचा गाभा होता. इतिहासावर मतभेद असू शकतात; मात्र त्यावर संयत, अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात संघर्ष निर्माण होऊ नये,जात-धर्म-पंथावर ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये,हीच भूमिका मी मांडली होती.

प्रकरणी भाजपचा तीव्र शब्दात निषेध करतो त्यांच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दाचा गैरवापर केल्या बद्दल शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू कधीही नव्हता व राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp मध्ये मोठा बदल, आई-वडिलांकडे राहणार तुमच्या प्रत्येक चॅटची माहिती; कसं ते वाचा

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण

Chanakya Niti : ज्या व्यक्तीकडे असेल 'ही' अनमोल गोष्ट, त्याला पृथ्वीवरच स्वर्ग मिळेल

Goregaon Mulund Link Road: मुंबई-ठाण्याची वाहतूक कोंडी फुटणार; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचं काम सुरु; वाचा अपडेट

जयशंकर यांचा एक फोन अन् भारताचं गॅसचं टेन्शन मिटलं; इराणने घेतला सर्वात मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT