गडकरींच्या सुचनेला नकारघंटा; पुण्यात भाजप- राष्ट्रवादी आमने-सामने Saam TV
मुंबई/पुणे

गडकरींच्या सुचनेला नकारघंटा; पुण्यात भाजप- राष्ट्रवादी आमने-सामने

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाच्या कामावरून आता महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीत नवा वाद उभा राहीला आहे.

अमोल कविटकर, पुणे

पुणे : पुण्यात आता सिंहगड रोड उड्डाणपुलाच्या उभारणीवरूनही भाजप - राष्ट्रवादी आमनेसामने आलेत आहेत. सिंहगड रोडवरचा प्रस्तावित उड्डाणपूल हा एक मजलीऐवजी भविष्यातील मेट्रोच्या हिशेबाने डबलडेकर करावा, या नितीन गडकरींच्या सुचनेला प्रशासनाकडूनच नकारघंटा मिळाल्यानंतर आता राष्ट्रवादी भाजपवर सरशंधान करू लागली आहे.

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाच्या कामावरून आता महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीत नवा वाद उभा राहीला आहे. झालं असं की पुलाच्या भूमिपूजनावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुलाच्या रचनेत बदल सुचवले. मात्र हे बदल स्वीकारणे व्यवहार्य नसल्याचं प्रशासकीय पातळीवर निदर्शनास आलं आणि हाच धागा लक्षात घेऊन राष्ट्रवादी भाजपवर निशाणा साधत आहे.

सिंहगड रोड उड्डाणपूलाचा नेमका वाद काय?

■ गडकरींनी हा उड्डाणपूल दुमजली बांधण्याची सूचना केली.

■ पण अभ्यासअंती गडकरींनी सुचवलेलं मलेशियन तंत्र सिंहगड रस्त्यावर व्यावहारिक नाही, प्रशासनाचा अहवाल.

■ उड्डाणपूलाचा खर्चही 25 कोटींनी वाढतोय, शिवाय वाहन क्षमताही वाढत नाही.

■ म्हणूनच राष्ट्रवादीचा डबलडेकर पूल बांधण्यास विरोध.

तर राष्ट्रवादीच्या या भूमिकेला भाजपनंही जोरदार उत्तर दिलंय... गडकरी यांची सूचनेला विरोध करायचा असेल तर राष्ट्रवादीनं आधी त्यांच्या वरीष्ठ नेत्यांशी अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा करावी, अशी गुगली भाजपनं टाकली आहे.

वाहतूक कोंडीने मेटाकुटीला आलेल्या पुण्याच्या पश्चिम भागातील नागरिकांसाठी सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. मात्र कामाचं भूमिपूजन होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी काम सुरु झालेलं नाही. त्यातच सत्ताधारी-विरोधकांत यावरुन वादाची ठिणगी पडल्याने हे कामच रखडण्याची भीती आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : बॉलिवूड अभिनेत्रीचा परदेशात भयानक अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना महागाईचा दणका! गॅस सिलिंडरनंतर सीएनजीही महागला, पाहा नवे दर

Constant Fatigue And Headache: सतत थकवा अन् डोकेदुखी? 'हे' 6 बदल शरीरात दिसताच व्हा सावध; दुर्लक्ष केल्यास पडेल महाग

रायगडच्या दिवेआगर समुद्रात बुडालेल्या ८ विद्यार्थ्यांची नावे समोर

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

SCROLL FOR NEXT