(पूनम महाजनांंनी राऊतांना झापलं) Poonam Mahajan Vs Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

राऊतांनी दिमाखत केलं ट्विट अन् झाले ट्रोल! पूनम महाजनांनी काढली मर्दानगी; पहा नेमकं काय घडलं?

Poonam Mahajan Vs Sanjay Raut: "...नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका" - पूनम महाजनांनी राऊतांना झापलं, राऊतांनी ट्विट डिलीट केलं, पहा काय होतं त्यात...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या एका व्यंगचित्रामुळे संजय राऊतांची चांगलीच गोची झाली आहे. शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत संजय राऊतांनी एक व्यंगचित्र (Cartoon) शेयर केलं होतं. त्यात शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि भाजपचे नेते स्वर्गीय प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांना दाखवण्यात आले आहे. परंतू यात बाळासाहेब ठाकरे हे एका खुर्चीवर बसलेले तर दुसऱ्या खुर्चीवर पाय ठेवलेले दिसतायत तर प्रमोद महाजन उभे असून बाळासाहेब प्रमोद महाजन यांना बसण्यास सांगत आहेत आणि शेजारीच एक छोटा पाट किंवा स्टूल ठेवण्यात आल्याचं या व्यंगचित्रात दिसतंय. (bjp mp poonam mahajan slams shiv sena mp sanjay raut for controversial cartoon)

राऊतांनी डिलीट केलेल्या ट्विटचे स्क्रीनशॉट

यावरुन भाजप हा तेव्हा स्वतः शिवसेनेकडे सीटच्या (महायुतीच्या) बोलणीसाठी आले होते असे दाखवण्यात आले आहे. हे कार्टून ट्विट करत संजय राऊतांनी (Sanjay Raut) "कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे…बघा नीट…" असं कॅप्शन दिलं. त्यामुळे प्रमोद महाजन यांच्या कन्या तथा भाजप खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांनी संजय राऊतांना चांगलंच झापलं.

खासदार पूमन महाजन यांनी संजय राऊतांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत लिहिलं की, "स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका." अशा कडक शब्दांत त्यांनी राऊतांना दणका दिला. यानंतर संजय राऊतांनी ते ट्विट लगेचचं डिलीट केलंं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. अनेकांनी राऊतांच्या ट्विट्सचे स्क्रीनशॉट्स शेयर करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. आता यामुळे भाजप आणि शिवसेनेत पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT