BJP MLA Narendra Mehta school onion garlic ban saam tv
मुंबई/पुणे

विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण बंदी, भाजप आमदाराच्या शाळेत अजब फतवा

BJP MLA Narendra Mehta's School Bans Onion, Garlic: शाळेत विद्यार्थ्यांनी काय खावं आणि काय नाही? यासंदर्भात फतवा काढण्यात आलाय..ज्यामुळे मराठी एकीकरण समितीसह मनसे आणि ठाकरेसेना या आमदाराविरोधात आक्रमक झालीय... शाळेचा फतवा नेमका काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

पर्युषण काळात मीरा-भाईंदर आणि वसई विरार शहारात मांसविक्रीवर बंदी आणा, अशी मागणी जैन समाजानं केल्यानं आधीच वाद पेटलाय. त्यात आता भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या शाळेनं विद्यार्थ्य़ांसाठी अजब फतवाच काढलाय...सेवन स्क्वेअर अकॅडमी शाळेत विद्यार्थ्यांना डब्ब्यात कांदा, लसूण तसचं बटाटा, बीट आणि कंदमूळ आणण्यास बंदी करण्यात आलीय.. एवढंचं नाही तर आमदार मेहतांच्या शाळेच्या कॅन्टीनमध्येही हे पदार्थ वर्ज्य करण्यात आलेत.. यासंदर्भातील नोटीसही पालकांना व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवण्यात आलीय..मात्र जैन समाजाचा पर्युषण काळ सुरु असल्यानं हा फतवा काढण्यात आल्यानं पालकांसह मनसे आणि मराठी एकीकरण समितीनं आक्रमक पवित्रा घेतलाय...

तर लव्ह जिहादपेक्षाही हा भंयकर प्रकार असल्याचा आरोप ठाकरेसेनेनं केलाय. तसंच धर्म तुमच्या घरात ठेवा असा खोसचक सल्ला राऊतांनी दिलाय. दरम्यान शाळेकडून कोणतीही सक्ती करण्यात आलेली नसल्याचा दावा करत आमदार नरेंद्र मेहतांनी मात्र आपल्या मनमानीची भूमिका कायम ठेवलीय. पर्युषण काळ संपल्यानंतर गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवातही विद्यार्थ्यांना नॉनव्हेज डब्यात आणू नका असं सांगणार असल्याचं विधान करून मेहतांनी आणखीनच आगीत तेल ओतलंय. मात्र गुजरात, राजस्थानमधील शाळांमध्येही असा फतवा काढला जात नाही, अशी टीका मंत्री प्रताप सरनाईकांनी करत मेहतांना घरचा आहेर दिलाय.....

शाळांमध्ये पोषक आहार देण्याचं धोरण असताना सण उत्सव आणि धर्माच्या नावाखाली विद्यार्थ्यांना कांदा-लसूण घातलेल्या मुलभूत खाद्यपर्दांपासून वंचित ठेवणं केवळ नैतिकतेच्याच नव्हे तर कायद्यानंही गैर आहे. आमदार मेहतांना त्यांचं पर्युषण पाळायचं असेल तर त्यांनी त्यांच्या घरात पाळावं. असले चोचले शाळेतल्या सर्वजातीय आणि सर्वधर्मीय विद्यार्थ्यांवर लादू नयेत. अन्यथा सत्ताधारी आमदाराच्याच आडमुठ्या आणि उफराट्या धोरणामुळे उगाचंच मराठी-जैन वाद पेटण्याची शक्यता आहे.

दरम्यान सर्व स्तरातून या सगळ्याचा निषेध झाल्यानंतर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेवन स्क्वेअर अकॅडमी शाळेने अखेर वादग्रस्त फतवा मागे घेतला आहे. शाळेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून हा फतवा हटवण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी सायंकाळपर्यंत हा फतवा मागे घ्या, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. मात्र, अविनाश जाधव यांच्या इशाऱ्यानंतर आंदोलनाची वेळ येण्यापूर्वीच शाळेने हा फतवा हटवल्याचे शाळेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काही मागण्या राजकीय फायद्यासाठी असतात, मनोज जरांगे पाटलांनी गणेशोत्सवाचा विचार करावा- सामंत

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! १८ हजार २७६ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण

SCROLL FOR NEXT