भाजप आमदार जयकुमार गोरे म्हणाले...मी अजितदादांचा फॅन! Saam TV
मुंबई/पुणे

भाजप आमदार जयकुमार गोरे म्हणाले...मी अजितदादांचा फॅन!

यानिमीत्त दत्ता भरणेंनी गोरेंना पक्षात येण्याची ऑफरही दिली आहे.

मंगेश कचरे

पुणे : राजकारणात भलेही आमचे पक्ष वेगळे..विचारसरणी वेगळी..पण अजितदादांच्या कामाची पद्धतच न्यारी असं म्हणत माण खटावचे भाजपा आमदार जयकुमार गोरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं (Ajit Pawar) बारामतीतील कार्यक्रमात तोंड भरून कौतुक केले आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी दादांचा फॅन आहे असे देखील आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) म्हणाले.

निमित्त होतं बारामतीतल्या चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या इमारतीच्या उद्घाटनाचं. कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढण्याच्या भीतीने अजित पवारांनी कार्यक्रमाच्या नियोजित वेळे आधीच एक तास येवून हॉस्पिटलचे उद्घाटन केले. त्यानंतर नियोजित वेळेत राज्यमंत्री दत्ता भरणे (Datta Bharane) आणि माण खटावचे आमदार जयकुमार गोरे कार्यक्रमाला हजेरी लावली आणि या दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली.

जयकुमार गोरे म्हणाले, दादा हे दादाच आहेत. भले आमचे पक्ष वेगळे..विचारसरणी वेगळी पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी दादांचा फॅन आहे. आमचं राजकारणात तर अजिबात पटत नाही मात्र, दादांची काम करण्याची पद्धत खूप आवडते. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जयकुमार गोरेना पक्षात येण्याची ऑफर दिली. बारामतीच्या नेत्यांनी जर एखाद्याला हात दिला तर दगडात देखील पाणी काढू शकतात. आमच्या दादांचे तुम्ही तुम्ही तोंड भरून कौतुक केलं आहे. भाऊ तुम्ही हाडाचा कार्यकर्ता आहात. चुकतो तोच माणूस असतो. आमच्या नेत्याचा उल्लेख चांगला केला आहे. तुमच्या डोक्यात चांगला विचार येउद्या. आणि भविष्यात चांगला विचार भविष्यात करा अस म्हणत भरणेंनी जयकुमार गोरेना पक्षात येण्याची ऑफार दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT