'कोरोना बळींच्या नातेवाईकांचे ५० हजाराही वसूली सेनेने खाल्ले की काय?' Saam TV
मुंबई/पुणे

'कोरोना बळींच्या नातेवाईकांचे ५० हजाराही वसूली सेनेने खाल्ले की काय?'

'या प्रकाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आणि महापालिका आयुक्तांनी माफी मागितली पाहिजे '

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : मोदी सरकारच्या (Modi Goverment) योजनेनुसार कोविडमध्ये (Corona) बळी गेलेल्याच्या वारसांना 50 हजार रुपये देण्याच्या योजनेत मुंबई महानगर पालिकेने आणि शिवसनेच्या राज्य सरकारने शेकडो लोकांना पैसे फक्त आणि फक्त कागदावर पैसे क्रेडिट झाल्याचं दाखवलं मात्र प्रत्यक्षात त्यांच्या खात्यात पैसे गेले नाहीत आणि या घटनेला आता एक एक महिना झाल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे.

शिवाय हा केवळ शिवसेनेचा (Shivsena) कारभार असून तो किती बेशरम आहे हेच यामधून दिसतं आहे. त्यामुळे कोविडमध्ये बळी गेलल्या त्यांना मनस्ताप देणाऱ्या लोकांना तात्काळ पैसे दिले जावेत आणि या प्रकाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आणि महापालिका आयुक्तांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

काय आहे योजना -

कोरोना काळात कोरोनामुळे दगावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने पन्नास हजार रुपयांचा निधी देण्याची योजना सुरु केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT