''राज्यात तक्रारदार स्थानबद्ध आणि गुन्हेगार मुक्त'' - आशिष शेलारांची घणाघाती टीका twitter/@BJP4Maharashtra
मुंबई/पुणे

''राज्यात तक्रारदार स्थानबद्ध आणि गुन्हेगार मुक्त'' - आशिष शेलारांची घणाघाती टीका

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. किरीट सोमय्या प्रकरणी त्यांनी सरकारला धारेवर धरले. तसेच राज्यात तक्रारदार स्थानबद्ध आणि गुन्हेगार मुक्त' अशी खोचक टीका करत महाराष्ट्र अराजकतेकडे चाललाय असंही ते म्हणाले आहेत. (BJP MLA Ashish Shelar has stated that Maharashtra is heading towards anarchy)

आशिष शेलार पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

आशिष शेलार पत्रकार परिषदेत म्हणाले की, सरकारी पक्षाकडून काही घटना घडतायत, महाराष्ट्रात लोकशाही उरल्यावर सरकार महाराष्ट्र राज्य अराजकतेकडे चाललंय. समाज माध्यमांवर कोणी व्यक्त झालं आणि ते सरकार विरोधात असेल, तर एखाद्याच मुंडन केलं जातं, अधिकाऱ्याचा डोळा फोडला जातो, पत्रकारावर गुन्हा दाखल केला जातो, अधिकाऱ्याला अटक होते, केंद्रीय मंत्री अटक होतो, राज्यात दहशतवादी कारवाया होत असताना एटीएस पोलीस थंड असतात. गृहमंत्री पदावर बसले होते, ते वॉन्टेड आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी होते ते सापडत नाहीत. समोर बसलेल्या पक्षाचा आमदार आपल्या पक्षाचा नाही, हे कळल्यावर लुकआउट नोटीस दिली जाते, याचं चित्र अराजकतेकडे चालललोय असं दिसतंय.

हे देखील पहा -

तक्रारदाराला स्थानबद्धता आणि गावगुंडांना मुक्तता

करुणा शर्मा नावाची माहिती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला जातेय, म्हणून तिला अटकाव करायला तिच्यावर आरोप करून रोखलं जातंय. लखोबा लोखंडे नावाच्या व्यक्तीला पुण्यात शिवसैनिकांनी न्यायालयाच्या दरवाजावर तुडवून मारलंय. आमचे नेते कोल्हापुरात तक्रार दाखल करायला जातायत तर त्यांना स्थानबद्ध केलं जातं. तक्रारदाराला स्थानबद्धता आणि गावगुंडांना मुक्तता असं चाललंय. किरीट सौमय्या कायदा हातात घेणार होते, की तिथे असणारे गावगुंड घेणार होते? असा सवाल शेलारांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले की, किरीट सोमय्या आधी घोषित करतात आणि त्यांना झेड सिक्युरिटी आहे, त्यांना सांगावं लागतं मी कुठे जाणार आहे, तक्रार दाखल करायला जाणार आहे. त्यांनी आंदोलन, घेराव, माणसं घेऊन जाणार आहे असं काहीही त्यांनी सांगितलं नाही तरी त्यांना स्थानबद्ध कशाला केलं? काल मुंबईत सव्वाशे पोलीस नीलम नगरला घेराव घालायला होते.

मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावे

पुढे शेलापृर म्हणाले की, साकिनाका घटना असुरक्षित वातावरणात, पोलिसांना गणपतीची सुरक्षा, अश्यावेळी पोलीस तिकडे एवढे लावले जातात. कलेक्टरची सूचना चुकीची आणि बोगस? तिकडचे पोलीस मुंबई पोलिसांच्या हद्दीत आले या सगळ्याची नोंद झाली होती का? सेना नेते म्हणतात मुख्यमंत्र्यांना या संदर्भात काहीच माहिती नाही. मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी अशी मी मागणी करतो . महाराष्ट्र राज्याची आपली कणखर भूमिका रसातळाला जाणार नाही, यासाठी मुख्यमंत्र्यांनीही चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी शेलारांनी केली.

माझं सरकार की माझा महाराष्ट्र, दोघांपैकी एक काय ते मुख्यमंत्र्यांनी आज ठरवावं

राज्यपाल आपलं काम कायदेशीर करतायत, त्यांचं या प्रकरणाकडे लक्ष असेल. तीनही पक्ष बिथरले आहेत. भाजपच्या लोकशाही मध्यातून हे आंदोपल उभारलय त्याला हे पक्ष बिथरलेत असं शेलार म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांना न सांगता कारवाई होते, मुख्यमंत्री व्यक्त होतायत की नाही? कोरोनात ते म्हणायचे "होय मी जबाबदार" आणि आता 'होय मी बेजबाबदार' असं त्यांनी ठरवलय का? माझं सरकार की माझा महाराष्ट्र, दोघांपैकी एक काय ते मुख्यमंत्र्यांनी आज ठरवावं असं आवाहन शेलारांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Israel Iran War : इराण की इस्रायल कोण पडणार युद्धात भारी? कोणाची किती ताकद? वाचा सविस्तर

Actor Govinda News : अभिनेता गोविंदाला गोळी लागली की मारली? मिसफायरिंगवर संशयाची सुई, पाहा व्हिडिओ

Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांना मोठं यश; शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांना केली अटक, दीड महिने कुठे होते?

Alcohol Viral Video: दारूमुळे होतो कॅन्सर? काय आहे सत्य? जाणून घ्या...

Harshvardhan Patil News : शरद पवारांकडून भाजपला सर्वात मोठा धक्का; पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता हाती तुतारी घेणार, वाचा

SCROLL FOR NEXT