Nitesh Rane News  Saam tv
मुंबई/पुणे

Nitesh Rane : दहशतवाद्यांना हाताशी धरून राहुल गांधी खासदार झाले; केरळला मिनी पाकिस्तान म्हणत नितेश राणेंचा काँग्रेसवर प्रहार

Nitesh Rane Latest News : मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. दहशतवाद्यांना हाताशी धरून राहुल गांधी खासदार झाले, असा प्रहार मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेसवर केला.

Vishal Gangurde

पुणे : भाजप आमदार आणि महायुतीचे मंत्री नितीश राणे यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. केरळला मिनी पाकिस्तान म्हणत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दहशतवाद्यांना हाताशी धरून खासदार झाल्याची टीका मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेसवर केली आहे. मंत्री नितेश राणे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

मंत्री नितेश राणे हे पुणे दौऱ्यावर होते. पुणे जिल्ह्यातील सासवड गावात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. या कार्यक्रमात नितेश राणे म्हणाले, 'महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. नितेश राणे पुढे म्हणाले, 'केरळ एक मिनी पाकिस्तान आहे. यामुळे राहुल गांधी आणि त्यांची बहीण निवडून येतात. तिथे दहशतवादी मतदान करतात. सर्व दहशतवाद्यांना एकत्र करून हे लोक खासदार झाले आहेत'.

मंत्री नितेश राणे यांना कार्यक्रमात सहभागी होण्याआधी पोलिसांनी वादग्रस्त वक्तव्ये टाळण्याची सूचना दिली होती. त्यानंतरही नितेश राणे यांनी खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर वक्तव्य केलं आहे. नितेश राणे हे भाजपचे वरिष्ठ नेते नारायण राणे यांचे पूत्र असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. वादग्रस्त वक्तव्ये प्रकरणी त्यांच्याविरोधात ३८ गुन्हे दाखल आहेत.

मंत्री नितेश राणे यांच्याविरोधात मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात वादग्रस्त वक्तव्ये प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला होता. नितेश राणे यांनी नवी मुंबईतील गणेशोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान अल्पसंख्याक समुदायावर मोठं भाष्य केलं होतं.

दरम्यान, या वर्षीच्या एप्रिल महिन्यात मीरारोड दोन गटात हिंसा झाल्याची घटना घडल्यानंतर अल्पसंख्याक समुदायाला धमाकवल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले होते. मात्र, पोलिसांनी नितेश राणे यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यावेळी नितेश राणे यांनी 'रोहिंग्या आणि बांगलादेशी' या शब्दांचा वापर केला होता. ते भारतीयांविरोधात बोलले नसल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stroke risk: रोज 2 मिनिटांची तुमची ही सवय स्ट्रोकचा धोका करते कमी; डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

'पोलिसांनी गळा दाबला, प्रायव्हेट पार्टवर मारलं'; दिल्लीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची अमानुष मारहाणीची आपबिती

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या उमरग्यात थकीत ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक; तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढले

Changing Room Safety Tips: चेंजिंग रूममध्ये कुठे कुठे असू शकतो छुपा कॅमेरा? कपडे ट्राय करताना 'या' ५ जागा नक्की तपासा

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून गूड न्यूज! ५ हजार रुपये मदतीसह कर्जमाफीबाबत महत्त्वाचे ८ मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT