BJP Politics Saam Tv
मुंबई/पुणे

BJP Politics: भाजपकडून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू; रात्री उशिरापर्यंत खलबतं, नेमकी काय चर्चा झाली? VIDEO

BJP Meetiing On Vidhan Sabha Election 2024 After Lok Sabha Election Result: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची काल रात्री उशिरा बैठक झालीय. यामध्ये भाजप आमदारांच्या लोकसभेतील कामगिरीवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.

Rohini Gudaghe

सुरज मसुरकर, साम टीव्ही मुंबई

राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या बैठकींचा सिलसिला सुरू आहे. विधानसभेसाठी भाजपची देखील रणनिती ठरत आहेत. यादरम्यान भाजपची रात्री उशिरापर्यंत खलबतं झाल्याची माहिती सुत्रांनी साम टीव्हीला दिलीय. नेमकी ही बैठक का आयोजित करण्यात आली होती? या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत सविस्तर जाणून घेवू या.

भाजप विधानसभेसाठी अलर्ट मोडवर

भाजपची काल १८ जुलै रोजी रात्री उशिरापर्यंत बैठक (BJP Meetiing) झाली. या बैठकीमध्ये लोकसभा निकालावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये सुमार कामगिरी केलेल्या आमदारांच्या अडचणी विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढण्याची शक्यता आहे. चांगली कामगिरी न केलेल्या आमदारांची विधानसभा उमेद्वारी धोक्यात असल्याचे संकेत मिळत (Vidhan Sabha Election 2024) आहेत.

बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

लोकसभेच्या निकालानंतर भाजप विधानसभेसाठी अलर्ट मोडवर आलंय. लोकसभा निवडणुकीत काम न केलेल्या आमदारांना भाजप धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती साम टीव्हीला सुत्रांनी (Maharashtra Politics) दिलीय. लोकसभा निवडणुकीतील आमदारांच्या कामगिरीवर बैठकीत चर्चा झालीय. तर लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी न केलेल्या आमदारांची तिकीटं विधानसभेत कापली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे, त्यामुळे काय निर्णय होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भाजपची रात्री उशिरापर्यंत खलबतं

तसेच तीनही पक्षातील विद्यामान आमदारांच्या जागा त्याच पक्षाकडे राहण्याची शक्यता या बैठकी दरम्यान वर्तविण्यात आलीय. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप १५० जागा लढण्याच्या तयारीत (BJP) आहे. अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाल्याचं समोर आलं होतं. यावर देखील बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या निर्णयांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT