Uddhav Thackeray SaamTV
मुंबई/पुणे

"2024 ला महाराष्ट्रातील जनतेनं मुख्यमंत्र्यांना अंडी उबवण्यासाठीच ठेवलंय हे कळेल"

आम्ही युतीत 25 वर्ष नको ती अंडी उबवली असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बारामती येथील भाषणात केले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आम्ही युतीत पंचवीस वर्ष नको ती अंडी उबवली असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) बारामती येथील भाषणात केले होते त्यांच्या याच वक्तव्याला भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युतर दिलं आहे. 'मुख्यमंत्री काय बोलतात हे एकदा त्यांना विचारून घ्या उद्धव ठाकरेंची भाषण ऐकण्यासाठी ट्रान्सलेटर लागेल असं वाटतं कारण ते काय बोलतात नेमकं कोणालाच कळत नसेल.

हे देखील पहा -

तसेच तुम्ही पंचवीस वर्ष तुम्ही राजकारणात होता का ? 25 वर्षापुर्वी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते साहेबांच प्रेम होत भाजपवरती तसेच भाजपचही बाळासाहेब ठाकरेंवरती. (BJP, Balasaheb Thackeray) आणि या दोघांमध्ये उद्धव ठाकरे कुठेच नव्हते असं वक्तव्य भाजप नेते निलेश राणे यांनी माध्यमाशी बोलताना केलं. राणे म्हणाले 'मुख्युमंत्र्यांना युतीबाबत बोलण्याचा अधिकार काय ? 1995 मध्ये युतीची सत्ता आल्यानंतर ते राजकारणात आले नाहीतर त्याआधी ते फक्त हातात कॅमेरा घेऊन जंगलात फिरायचे ते कॅमेरामन Cameraman होते. असा टोला राणेंनी लगावला.

तसेच बाळासाहेबांनी आणि स्वर्गीय प्रमोद महाजन Pramod Mahajan यांनी जे काय परिश्रम घेतले युती टिकवण्यासाठी हे मुख्यमंत्र्यांना माहीतच नाही. एका मुख्यमंत्री काय बोलले पाहिजे, याबाबत त्यांच्या बोलण्यामध्ये तशी मॅच्युरिटी कुठे दिसत नाही. छापा काय, काटा काय, काय बोलतात ते त्यांचे त्यांना माहीत नाही. तसेच तुम्ही आधी मुख्यमंत्री म्हणून बोलायला शिका त्यासाठी सन्माननीय फडणवीस Fadnavis साहेबांकडून ट्रेनिंग घ्या. कारण राणे Rane साहेबांकडून तुम्ही घेणार नाही म्हणून फडणवीस साहेबांकडून घ्या आणि बोलायला शिका आणि नंतर कोणी 25 वर्षे अंडी उबवली त्यावर भाष्य करा. 2024 मध्ये महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला अंडी उबवण्यासाठी ठेवलंय हे कळेल, असा घणाघात निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवरती केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT