Shock to BJP in Pimpri-Chinchwad Saam Tv News
मुंबई/पुणे

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला धक्का! बड्या नेत्याची नाराजी उघड; थेट राजीनामाच दिला

Shock to BJP in Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवड भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी महापौर तुषार हिंगे यांनी पदाचा राजीनामा दिला. पिंपरी विधानसभा क्षेत्रावर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Bhagyashree Kamble

  • पिंपरी-चिंचवड भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी महापौर तुषार हिंगे यांनी पदाचा राजीनामा दिला.

  • पिंपरी विधानसभा क्षेत्रावर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

  • शहर सरचिटणीस पदाच्या मागणीकडे पक्षाने दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त केली.

  • त्यांच्या राजीनाम्यामुळे पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक आहेत. लवकरच या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला धक्का बसला आहे. भाजपचे नवनियु्क्त जिल्हा उपाध्यक्ष तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर तुषार हिंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या जम्बो कार्यकारणीत अगदी काही तासांतच फूट पडली. भाजप नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर तुषार हिंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. भारतीय जनता पक्षाचे शहाराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे.

राजीनामा दिल्यानंतर तुषार हिंगे यांनी मनातील खदखद बोलून दाखवली. 'पिंपरी विधानसभा क्षेत्रावर भाजपकडून अन्याय केला जात आहे. या विरोधात मी जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. माझी मागणी होती ती, एखाद्या पदाधिकाऱ्याला शहरचिटणीस पद देण्यात यावं. मात्र, पक्षाकडून माझ्या मागणीची उपेक्षा करण्यात आली.'

'सातत्यानं माझी मागणी डावलली गेली. याच कारणामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे', असं तुषार हिंगे म्हणाले. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या राजीनाम्यामुळे पिंपरी चिंचवड भाजपमध्ये नाराजीचा सूर अधिकच तीव्र झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे 2 कारमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

SCROLL FOR NEXT