Ram Kadam  Saam Tv
मुंबई/पुणे

Ram Kadam: तीन पक्षाचे सरकार नाना पटोलेंवर कधी कारवाई करणार, राम कदमांचा सवाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापायला लागलं आहे. भाजप नेत्यांनी यावर आक्षेप घेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीये. तर, भाजप नेते राम कदम यांनीही याप्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केलाय. नारायण राणेंना अटक करण्यासाठी पोलीस गेले मग आता नाना पटोलेंना अटक का केली जात नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला (BJP Leader Ram Kadam Demand To Take Action Against Nana Patole).

तीन पक्षाचे सरकार काँगेसच्या प्रदेशाध्यक्षांना अटक का करत नाही - राम कदम

"केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वस्तुस्थितीवर आधारित एक विधान केले त्या विधानानंतर राज्यभरातले सर्व पोलीस जागे झाले. सरकारने सर्व पोलिसांना त्यावेळी राणेंना अटक करण्यासाठी पाठवले. आता तेच हे तीन पक्षाचे सरकार काँगेसच्या प्रदेशाध्यक्ष यांना का अटक करत नाही".

"मोदींच्या बाबतीत त्यांनी वक्तव्य केले आणि आता ते सारवासारव करत आहेत. नारायण राणे यांच्यावर कारवाई करताना तुम्ही पुढेमागे पाहिले नाही, मग काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षावर कधी कारवाई करणार", असा प्रश्न राम कदम (Ram Kadam) यांनी उपस्थित केला.

नाना पटोलेंवर एफआयआर दाखल करण्याची राम कदमांची मागणी

FIR घ्या नाही तर आम्ही जेल भरो आंदोलन करु, असा इशाराही राम कदमांनी दिलाय. तसं ट्विट त्यांनी केलंय. "काँग्रेस प्रांत अध्यक्षावर FIR करत कारवाई करण्याचे सोडून महाराष्ट्र सरकार मोघलाई सरकार असल्या प्रमाणे वागत चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना ताब्यात घेते आहे. जेलच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. कारवाई करावीच लागेल", असं ते म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविषयी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणावरुन राज्यातील राजकारण आता पुन्हा तापायला लागलं आहे. नाना पटोले यांनी ‘मी मोदींना मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो’, असे वक्तव्य केले आहे. त्याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोटोले यांनी याबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

Healthy Relationship साठी या सोप्या ट्रिक्स करा फॉलो...

Jalgaon Shocking News : गरबा खेळताना अचानक तब्येत बिघडली; जळगावमध्ये 'दांडिया किंग'चा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT