narendra modi  Saam tv
मुंबई/पुणे

Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे ११वे अवतार; कुणी केलं विधान? वाचा

Raj purohit on Narendra modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाजप नेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे. या नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

राज पुरोहित यांनी मोदींना विष्णूचे ११वे अवतार म्हटलंय.

उज्ज्वल निकम यांच्या सत्कार सोहळ्यात पुरोहित यांनी हे वक्तव्य केलं.

राज पुरोहित यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मयुर राणे, साम टीव्ही

मुंबई : भाजप नेते राज पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११वे अवतार आहेत, असं वक्तव्य राज पुरोहित यांनी केलं आहे. भाजप नेते राज पुरोहित यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नुकतीच राज्यसभा सदस्यपदी वर्णी लागली. या नियुक्तीबद्दल आज दादर येथील वसंत स्मृती सभागृहात निकम यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात भाजप नेते प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सत्काराच्या कार्यक्रमाला भाजप नेते राज पुरोहित यांनीही हजेरी लावली. या कार्यक्रमात राज पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठं विधान केलं.

पुरोहित काय म्हणाले?

राज पुरोहित म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११वे अवतार आहेत. ते न थकणारे, न थांबणारे पंतप्रधान आहेत. आपण अमेरिकेला जाऊन आलो की आपल्याला दोन दिवस जेट लॅग लागतो. नरेंद्र मोदी फिनलंड, इंग्लंड दौरा करून अहमदाबादमध्ये दोन दिवसांत २२ उद्घाटन करतात'. कौतुक करताना राज पुरोहितांनी नरेंद्र मोदींची विष्णू भगवानसोबत तुलना केली. भाजप नेते राज पुरोहित यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.

उज्ज्वल निकम काय म्हणाले?

उज्ज्वल निकम म्हणाले, 'मी कुठल्याही गुन्हेगाराला न्यायालयाच्या माध्यमातून शिक्षा देण्याचा प्रयत्न करतोच. मात्र त्या गुन्हेगाराला समजून घेण्याचाही प्रयत्न करतो. त्याच्या कमकुवत बाजू जाणून घेतो. जेणेकरून त्याला अंतरिम दु:ख देण्याचा माझा प्रयत्न असतो'.

'मला तुरुंग हा जर मतदारसंघ दिला, तर मला कुणीही हरवू शकणार नाही. सर्व कैदी मला निवडून देतील. याची मला खात्री आहे. आज आमचा देश हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आहे. प्रत्येक कण माझा आहे. ही भावना प्रत्येक नागरिकांमध्ये निर्माण करण्याचे काम आपले आहे. आपल्या पक्षकारांना खोटे आश्वासन कधीही द्यायचे नाही, असेही निकम पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT