BJP Leader Kirit Somaiya Viral Video Threat Saam TV
मुंबई/पुणे

Kirit Somaiya Threat: ५० लाख दे, नाहीतर 'तो' व्हिडीओ व्हायरल करेल; किरीट सोमय्या यांना अज्ञाताकडून धमकी

Kirit Somaiya Viral Video Threat: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे.

सूरज सावंत

BJP Leader Kirit Somaiya Viral Video Threat

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. ५० लाख दे, नाहीतर कथित अश्लिल व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने सोमय्या यांनी दिल्याची माहिती आहे.

याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी मुंबईतल्या नवघर पोलिसांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, सोमय्या यांच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ३८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

सोमय्या यांना धमकी नेमकी कुणी दिली? याचा तपास पोलीस करीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, किरीट सोमय्या यांच्या मुंबईतील कार्यालयात एक मेल आला. ज्यामध्ये अज्ञात व्यक्तीने त्यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल (Viral Video) करण्याची धमकी दिली.

इतकंच नाही, तर आरोपीने किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याकडे ५० लाख रुपये खंडणीची मागणी देखील केली. या संपूर्ण प्रकारानंतर किरीट सोमय्या यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ समोर आला होता.

या व्हिडीओत सोमय्या एका महिलेशी फोनवर व्हिडीओ चॅट करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या व्हिडीओवरून मोठा वादंग उठला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती.

माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही. या व्हिडीओची सत्यता तपासावी आणि सखोल चौकशी करावी, असं सोमय्या यांनी म्हटलं होतं. यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात व्हायरल व्हिडीओ प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले होते. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून एका खासगी वृत्तवाहिनीवर कारवाई देखील करण्यात आली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Chikoo Benefits: डायबिटीज असलेली व्यक्ती चिकू खाऊ शकते का? जाणून घ्या

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

SCROLL FOR NEXT