kirit somaiya & uddhav thackeray saam tv
मुंबई/पुणे

Kirit Somaiya: 'नवाब मलिकांचे संबंध दाऊदशी तर ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी'

'सांगा ठाकरे पार्टनर कुणाचे? सांगा ठाकरे पार्टनर कुणा कुणाचे? हा सिझनचा पहिला एपिसोड आहे.'

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे: भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) आज पुण्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक (Nawab Malik) यांचे संबंध दाऊदपर्यंत पोहचू शकतात तर ठाकरेंचे संबंध कसाबपर्यंत आहेत असे म्हणत किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवरती गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर हेमंत करकरेंची हत्या कोणी केली? करकरेंनी घातलेलं बुलेटप्रुफ जॅकेट नकली होतं. विमल अग्रवालने बोगस खाणेरड्या बुलेटप्रुफ जॅकेटचा सप्लाय केला होता असेही सोमय्या म्हणाले.

सांगा ठाकरे पार्टनर कुणाचे? सांगा ठाकरे पार्टनर कुणा कुणाचे? हा सिझनचा पहिला एपिसोड आहे. यशवंत जाधव उद्धव ठाकरे यांचे उजवा हात आहेत. जाधव यांनी १ हजार कोटींची माया जमवली. मी श्री जी होम घोटाळा काढला त्यात ५० टक्के उद्धव ठाकरे पार्टनर तर ४० टक्के रश्मी ठाकरे पार्टनर आहेत असेही किरीट सोमय्या म्हणाले. त्याचबरोबर ठाकरे परिवाराचे यशवंत जाधवांसोबत काय संबंध आहेत हे उद्धव ठाकरे सांगणार का? असा सवालही सोमय्यांनी विचारला आहे.

हसन मुश्रीफांवर कारवाई सुरु- सोमय्या

हसन मुश्रीफांवर (Hasan Mushrif) कारवाई सुरू झाली आहे. हसन मुश्रीफांनी १५८ कोटी रुपयांचे मनिलाँड्रींग केले. हसन मुश्रीफ आणि शरद पवारांना प्रश्न विचारायचाय. तुम्ही हसन मुश्रीफांना प्रश्न कधी विचारणार? १६ कोटी ३१ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम ४० हजार शेतकऱ्यांकडून जमा केली त्यांच्या नावाने पैसे जमा केले असे म्हणत किरीट सोमय्यांनी मुश्रीफांवर आरोप केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग

Thursday Horoscope : परिस्थितीशी दोन हात करावे लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

Aravallis Hills: अरवली पर्वतरांगांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खाणकामावर पूर्णपणे बंदी, राज्यांना आदेश

Belly Fat: वयाच्या तिशीनंतरच का वाढतो पोटाचा घेर? जाणून घ्या 'चरबी' वाढण्याची ४ कारणे

Maharashtra Live News Update: चित्रपट दिग्दर्शक सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग

SCROLL FOR NEXT