Girish Bapat Passed Away Saam Tv
मुंबई/पुणे

Girish Bapat Passed Away: लढवय्या नेता हरपला! पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन

Girish Bapat News : वयाच्या ७२ वर्षी घेतला अखेरचा श्वास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Girish Bapat Passed Away : पुण्यातील भाजप खासदार गिरीश बापट यांचे आज पुण्यात निधन झाले. वयाच्या ७२ वर्षी बापट यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून बापट आजारी होते. शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. (Latest Marathi News)

दरम्यान गिरीष बापट यांच्या पश्चात कुटुंबात एक मुलगा आणि पत्नी आहेत. त्यांच्या निधनामुळे भाजपमध्ये शोककळा पसरली आहे. पुणे आणि कसबा मतदारसंघात भाजप पक्षाचा विकास करण्यासाठी त्यांनी अनेक परिश्रम घेतले. 

संघ स्वयंसेवक, नगरसेवक ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहेटेल्को कंपनीत 1973 ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही. 

गिरीश बापट (Girish Bapat) हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. जनसंघातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नगरसेवक म्हणून सुरुवात केलेले गिरीश बापट 1995 पासून सलग पाच टर्म आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे मोहन जोशी यांचा पराभव केला. (Pune News)

गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास

गिरीश बापट यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने तेव्हा प्रारंभ झाला जेव्हा ते आणीबाणीच्या काळात तुरुंगात शिक्षा भोगून आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी बापट यांनी यशस्वीपणे पार पडली.

१९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते नगरसेवक झाले. त्यानंतर सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. याचा काळात बापट आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले.

त्यानंतर त्यांनी 1995 मध्ये आमदारकीची निवडणूक लढविली आणि पुढे सलग पाच टर्म निवडून आले. भाजपने 1996 साली त्यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण त्यावेळी बापट यांचा पराभव झाला होता.

2014 मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, 2019 मध्ये त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळवले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: आंघोळ न करता जेवण बनवणं अशुभ असतं?

Maharashtra Live News Update: भाईंदर पश्चिमेकडील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १८ जुगारी अटकेत

Pranjal Khewalkar: खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणाला नवे वळण, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नेमकं काय?

Tejaswini Lonari: नथीचा नखरा अन् नऊवारी साडी...; नवरात्री निमित्तानं तेजस्विनीचा मनमोहक लूक, पाहा PHOTO

EPFO News : PF खातेधारकांसाठी खुशखबर! एटीएममधून मिनिटांत काढता येणार पैसे, 'या' तारखेपासून सुरु होणार सेवा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT