kishori pedenakar  saam tv
मुंबई/पुणे

सोमय्यांची किशोरी पेडणेकरांविरोधात पोलिसांत तक्रार; एसआरए घोटाळ्यावरून केले 'हे' गंभीर आरोप

एसआरए घोटाळ्यावरून किरीट सोमय्यांनी पोलिसांत किशोरी पेडणेकरांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

जयश्री मोरे

Kirit Somaiya News : भाजप नेते, किरीट सोमय्या यांनी आज 'एसआरए' घोटाळा संदर्भात किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात निर्मल नगर वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फोर्जरी, बनावटी करार, फसवणूकसाठी आयपीसी IPC 420 अंतर्गत गुन्हा एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे . पोलिसांनी चौकशी, कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी या प्रकरणात संबंधित इतरांचा मनसुख हिरेन होऊ नये, असं देखील किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

'निर्मल नगर पोलीस स्टेशन, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र राज्य, तसेच अनेक ठिकाणी तक्रार केल्या. यासंदर्भात आपण आमची तक्रार, एफ. आय. आर (FIR) दाखल करावी, अशा मागणीच्या आशयाचे पत्र किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) किशोरी पेडणेकरांच्या (Kishori Pednekar) विरोधात पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहे. सोमय्यांच्या पत्रानंतर पोलीस काय कारवाई करणार, हे पाहावे लागणार आहे.

किरीट सोमय्यांनी पोलिसांना पाठवलेले पत्र जसेच्या तसे

प्रति,

मा. पोलीस अधिकारी

निर्मल नगर पोलीस स्टेशन

वांद्रे (पूर्व), मुंबई.

दि. 04 नोव्हेंबर, 2022

विषय : श्रीमती किशोरीताई पेडणेकर यांच्या द्वारा एस.आर.ए चे गाळे हडप करणे, बेनामी गाळे ताब्यात घेणे, फोर्जरी / फसवणूक करणे.

महोदय,

मुंबईच्या माजी महापौर श्रीमती किशोरीताई पेडणेकर यांनी वरळी गोमाता जनता एस. आर. ए. प्रकल्पात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई, यांची फसवणूक करून अनेक गाळे स्वतःच्या ताब्यात घेतले. यासंदर्भात आम्ही निर्मल नगर पोलीस स्टेशन, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र राज्य, तसेच अनेक ठिकाणी तक्रार केल्या. यासंदर्भात आपण आमची तक्रार, एफ. आय. आर (FIR) दाखल करावी अशी आमची मागणी आहे.

यासोबत या घोटाळ्यासंबंधीचे सगळे कागदपत्रे, पुरावे देत आहे. आपण माझा एफ. आय. आर रजिस्टर करावा.

1. 2017 मधील मुंबई महापालिका निवडणुकीत किशोरीताई पेडणेकर यांनी जे निवडणूक शपथ पत्र भरले आहे, त्यात त्या स्वतः गोमाता जनता एस. आर. ए. च्या सहाव्या मजल्यावर राहत आहे असे लिहिले आहे.

2. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) यांनी स्पष्टता दिली आहे की, किशोरीताई पेडणेकर यांना कोणताही गाळा वाटप (allot) करण्यात आलेला नाही. त्या तेथे झोपडपट्टीत राहत नव्हत्या.

3. किशोरीताई पेडणेकर, त्यांच्या परिवाराने अश्याच पद्धतीने स्वतःची किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाने गोमाता जनता एस. आर.ए. मधील तळमजल्यावरील गाळा क्र. 4 व गाळा क्र. 5 ही ताब्यात घेतला.

4. हा गाळा अन्य लोकांच्या नावाने असताना किशोरीताई पेडणेकर, त्यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर, त्यांची कंपनी किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी खोट्या पद्धतीने या गाळ्यावर कब्जा करून त्याचा वापर करत होते / आहे.

5. या संदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) यांनी या तीनही गाळ्यांच्या विरोधात नोटिसेस दिल्या आहेत. फसवणुकीने हे गाळे पेडणेकर परिवार वापरत आहेत म्हणून कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात

Success Story: शाळेसाठी दररोज ६ किमी पायपीट; शेतातही केले काम; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

Saturday Horoscope: पाच राशींच्या जीवनात येणार आनंदी-आनंद; होणार धन वर्षाव, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Bhadrapada Amavasya 2025: आजच्या शनी अमावस्येचं महत्त्व जाणून घ्या; 'या' चुका करणं टाळा

Pune: बैलगाडा शर्यतीत अपघाताचा थरार, तरुण खाली पडला अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT