Aurangabad News: औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारली, श्रीकांत शिंदेच्या सभेला मात्र परवानगी

खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील याच परिसरात सभा होणार आहे. त्यांच्या सभेला मात्र परवानगी मिळाली आहे.
Aditya Thackeray-Shrikant Shinde
Aditya Thackeray-Shrikant ShindeSaam Tv
Published On

>> माधव सावरगावे

औरंगाबाद : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या सभेत सिल्लोड नगरपरिषदेने परवानगी नाकारली आहे. येत्या 7 नोव्हेंबर रोजी सिल्लोड शहरातील महावीर चौकात आदित्य ठाकरे यांची सभा होणार होते. खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील याच परिसरात सभा होणार आहे. त्यांच्या सभेला मात्र परवानगी मिळाली आहे.

दोन्ही सभा आमने सामने होणार असल्यामुळे सिल्लोड नगर परिषदेने ही परवानगी नाकारली आहे. श्रीकांत शिंदे यांची सभा झेडपी ग्राउंडवर तर आदित्य ठाकरे यांची सभा महावीर चौकात होणार होती. (Latest Marathi News)

Aditya Thackeray-Shrikant Shinde
Gujrat Eletions 2022: ईशुदान गढवी 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार! अरविंद केजरीवाल यांची घोषणा

सिल्लोड नगरपरिषद राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात ही नगर परिषद असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेचे ठिकाण बदलण्याची सिल्लोड नगर परिषदने सूचना केली आहे.

Aditya Thackeray-Shrikant Shinde
Jayant Patil : सेनेच्या ४० आमदारांच्या बंडामागे कोण होतं? जयंत पाटलांनी फडणवीसांवर केला गंभीर आरोप

श्रीकांत शिंदेंची सभा अब्दुल सत्तार यांनी नियोजित केली आहे. दोन्ही सभा जवळ होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आदित्य ठाकरे यांना परवानगी नाकारली आहे. मात्र जाणूनबुजून आदित्य ठाकरे यांच्या सभेला आडकाठी केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होत आहे.

ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं की, आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची विचारपूस करु. आम्ही मेळावा घेणार नाही. मात्र श्रीकांत शिंदेनाच कशी परवानगी मिळाली, असा सवालही खैरे यांनी विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com