Devendra Fadnavis Uddhav Thackeray News Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : वीजबिल माफ करा, असं मी बोललोच नाही; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण

उद्धव ठाकरेंना वीजबिल प्रश्नावर बोलायचा अधिकारच नाहीये, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray : बुलडाण्यातील चिखली येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. फडणवीस हे विरोधात असताना कसे वीजबिल माफ करण्याची मागणी करत होते पाहा, असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भरसभेत फडणवीसांची व्हिडीओ क्लिप लावली होती. इतकंच नाही तर, शेतकऱ्यांची संपूर्ण वीजबिल माफी करा, असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आता यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'मी वीजबिल माफ करा असं मी कधीच म्हटलं नाही. कोरोना काळात मध्यप्रदेश सरकारने वीजबिल स्थगित आणि नंतर माफ केलं होतं. तसंच महाराष्ट्रातही करावं. तोच पॅटर्न राबवावा, अशी मी मागणी केली होती. पण तत्कालिन ठाकरे सरकारने एक रुपयाचीही सूट शेतकऱ्यांना दिली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना वीजबिल प्रश्नावर बोलायचा अधिकारच नाहीये, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलं आहे.

राज्यात सध्या खरीप पिकाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. शेतकरी रब्बीच्या पेरणीसाठी सज्ज झाला. मात्र वीज कंपनीचे थकीत बिल भरले नाही म्हणून लाइनमन बांधावर येऊन थकीत बिलापोटी दहा हजार भरा नाहीतर वीज कट करू, असे सांगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर ‘महावितरण’चे संकट आल्याची स्थिती आहे.

शेतकऱ्यांसमोर उभ्या असलेल्या या संकटावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलडाण्यात बोलताना, देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत त्यांना शेतकऱ्यांची वीजबिलं माफ करा, असं आवाहन केलं होतं. चिखलीतील सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लीप लावली होती.

या क्लिपमध्ये देवेंद्र फडणवीस हे विरोधात असताना शेतकऱ्यांची वीजबील माफ करा, अशी मागणी करताना दिसून येत होते. ती क्लीप लावून आता शेतकऱ्यांची वीजबिलं माफ करा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलं. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत मी वीजबिल माफी करा असं कधीच म्हटलं नव्हतं, उद्धव ठाकरेंनी जना नाही तर मनाची तरी लाज बाळगावी, असं म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

MSRTC: शिवशाही बस आता नव्या अवतारात येणार; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूदरात लक्षणीय घट; सरकारचे कोणते उपाय ठरताहेत गेम चेंजर?

खाण उपसंचालकावर व्हिजिलन्सची धाड, अधिकाऱ्याच्या घरात नोटांच्या थप्या

कर्जफेडीसाठी 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या, विरोधक आक्रमक, अधिवेशनात पडसाद

SCROLL FOR NEXT