Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

भ्रष्टाचाराची हंडी फुटो, विकासाची मलाई सर्वांना मिळो - देवेंद्र फडणवीस

आता तुम्ही केवळ गोंविदा पथक नाही आहात, तर खेळाच्या टीम आहात - फडणवीस

सुरज सावंत

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली आपण भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहोत, आपण श्रीकृष्णाची विकासरुपी दहीहंडी देखील फोडत आहोत. कारण विकासरुपी मलाईचा भाग सर्वांना मिळाला पाहिजे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. ते आज भाजप आयोजित केलेल्या जांबोरी मैदान वरळी येथील दहीहंडीला उपस्थिती लावली यावेळी ते बोलत होते.

आज राज्यभरात दहीहंडीचा (Dahihandi) उत्सव पहायला मिळत आहे. मात्र, मुंबई, ठाण्यातील दहीहंडीचा उत्सव अनोखा असतो. मुंबईकरांच्या मनातील या उत्सवाचं स्थान राज्यातील राजकीय पक्षांना देखील चांगलं माहित आहे. शिवाय मुंबई पालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी दहीहंडीचं आयोजन केलं आहे. शिवसेना (Shivsena) ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यासह भाजपने देखील मोठंमोठी बक्षिस ठेवली आहेत.

अशातच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जांबोरी मैदानातील भाजपच्या दहीहंडीला उपस्थिती लावली यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, या मैदानात लटकवलेली मटकी फुटो आणि सर्वांना त्या हंडीमधील मलाई मिळो, मोदींच्या नेतृत्वात आपण भ्रष्टाचाराची हंडी फोडत असल्याचं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या विरोधकांना टोला लगावला.

ते पुढे म्हणाले, आता आमचा गोविंदा साहसी खेळात समाविष्ठ झाला आहे. आता तुम्ही केवळ गोंविदा पथक नाही आहात, तर खेळाच्या टीम आहात. तुमची सर्व काळजी आपलं सरकार घेणार आहे. शिवाय हे सरकार तरुणाईचं सरकार आहे. हे राज्य तुमचं आहे, उत्साहात आनंदलुटा असं म्हणत फडणवीस यांनी गोविंदाना संबोधित केलं.

राज्यभरात आज गोपाळकालाचा (Gopalkala) उत्साह पाहायला मिळत आहे. कोरोना संकटामुळं जवळपास दोन वर्षांनी दहीहंडी साजरी होत आहे. त्यामुळे गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.

दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांच्या घाटकोपरच्या श्रेयस सिनेमाजवळील दहीहंडीला मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सगळे निर्बंध हटवून हिंदू सण साजरे करण्यास परवानगी दिल्याने त्यांनी शिंदे सरकारचे आभार मानले. तर शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आणि मराठी सणही मागे सोडलेत. त्यामुळेच त्यांनी जांबोरी मैदानात परवानगी घेतली नाही. असंही आमच्या पाठिंब्यावर आदित्य ठाकरे वरळीत निवडून आल्याचं देखील आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT