Devendra Fadnavis, Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: 'मावळ'वरुन महायुतीत मिठाचा खडा? राष्ट्रवादीच्या जागेवर भाजपचा दावा; आमदार सुनील शेळके आक्रमक

दिलीप कांबळे

मावळ, ता. ३० जुलै २०२४

राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभेनंतर आता विधानसभेच्या जागा वाटपावरुन महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्ये कलगीतुरा रंगणार आहे. महायुतीमध्ये विधानसभेच्या जागा वाटपावरुन महायुतीमध्ये पहिली ठिणगी पडली असून मावळ मतदार संघावर भाजपने दावा केल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटही आक्रमक झाला आहे.

राष्ट्रवादीच्या जागेवर भाजपचा डोळा

भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनी मावळ विधानसभेचा पुढचा आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून येईल, असा दावा करत 2 ऑगस्टला मावळ विधानसभेत मेळाव्याचे आयोजन केले आहे .महायुतीचे प्रमुख मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र सध्या मावळचे आमदार असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी भाजपच्या दाव्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे.

सुनील शेळके आक्रमक

"मावळ लोकसभेत राष्ट्रवादीने महायुतीचा धर्म पाळला. मात्र त्यावर शंका घेत भाजप धरलेला हा आग्रह योग्य नसल्याचे म्हणत आमदार सुनिल शेळके यांनी म्हटले आहे. तसेच ज्या पक्षाचा आमदार, त्याच पक्षाच्या वाट्याला ती विधानसभा, असा बेसिक फॉर्म्युला महायुतीत ठरला आहे," असेही सुनिल शेळके म्हणाले.

"प्रत्येकाला महत्वाकांक्षा असल्यानं विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त करण्यात काही गैर नाही, त्या सर्वांनी माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र मी आगामी विधानसभा लढायला ठाम आहे का? हा निर्णय मी जनतेला विचारून घेईन. इतकंच काय तर 2 ऑगस्टच्या भाजपच्या मेळाव्याला ही मी जाऊ शकतो," असं म्हणत शेळकेंनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT