Shiv Sena, Sanjay Raut/file  SAAM TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut: संजय राऊतांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी, भाजप नेत्याची मागणी; त्या व्हिडीओवरुन विरोधक आक्रमक

संजय राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट करुन मराठा समाजाचा अपमान केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे विरोधक आक्रमक झाले आहे.महाविकास आघाडीच्या महामोर्चावर नॅनो मोर्चा अशी टीका भाजप शिंदे गटाने केली. या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी मुंबईतील मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट केला. मात्र हा व्हिडीओ मराठा क्रांती मोर्चा असल्याचा दावा भाजपने केला आहे.

संजय राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट करुन मराठा समाजाचा अपमान केला आहे. माझी उद्धव ठाकरेंकडे मागणी आहे की संजय राऊतांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.  (Latest Marathi News)

प्रसाद लाड यांनी म्हटलं की, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी सातत्याने मराठा समाज, मराठा मोर्चा, मराठा आरक्षण, मराठा आंदोलनचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. आज तर संजय राऊत यांनी मर्यादा पार केल्या आहेत. कालचा महाविकास आघाडीचा नॅनो मोर्चा किती मोठा होता हे दाखवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबईतील मोर्चाचा व्हिडीओ संजय राऊतांनी ट्वीट केला.

ज्या मोर्चामुळे मराठा समाजाला न्याय मिळाला तो मोर्चा जणू आपलाच असल्याचं संजय राऊतांनी दाखवलं. अशा प्रकारचं वाईट कृत्य संजय राऊत यांनी केलं. माझी मागणी आहे की संजय राऊत यांनी मराठा समजाची माफी मागवी, तुम्ही मराठा क्रांती मोर्चाची माफी मागावी, अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. माझी तर उद्धव ठाकरेंकडे मागणी आहे की संजय राऊतांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली.

व्हिडीओवरुन टीका होत असल्याने संजय राऊतांनी पुन्हा एक ट्वीट करत म्हटलं की, मराठा मोर्चा देखील महाराष्ट्र स्वाभिमान, न्याय्य हक्कांसाठी निघाला.शिवरायांचा जयघोष करीत त्याच मार्गावरून त्याच ताकतीने निघाला.तेव्हा देखील आजच्याप्रमाणे विराट मोर्चाची चेष्टा दबक्या आवाजात हेच लोक करत होते.दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते. तूर्त इतकेच! असं राऊतांनी दुसरं ट्वीट करत म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News : मुंबई-पुण्यातून धावणार २४८ विशेष उन्हाळी ट्रेन, सर्व यादी एका क्लिकवर

डोंबिवलीत स्टंटबाजांचा कहर! बाईकवर उभा राहून तरुणाचा जीवघेणा स्टंट, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: निकाला आधीच विजयाचा जल्लोष! पुणे मार्केट यार्डात सुनेत्रवाहिनींचे बॅनर झळकले

Diabetes Control Foods: डायबिटीज कंट्रोलमध्ये राहण्यासाठी ‘या’ भाज्या आणि फळांचा आहारात करा समावेश

देशाच्या राजकारणात उलथापालथ! विरोधकांचे ७ खासदार सत्तेत जाणार, यादी आली समोर; तिघांचा भाजपात आजच प्रवेश

SCROLL FOR NEXT