Mumbai Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : कारचा धक्का लागला, राग अनावर झाला; दुचाकीस्वाराकडून चालकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

Mumbai Crime News : कारचा धक्का लागल्याने दुचाकीस्वाराचा राग अनावर झाला. दुचाकीस्वाराकडून चालकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

मयूर राणे, साम टीव्ही

Mumbai News : मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावर खळबळजनक घटना घडली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर कारचा दुचाकीला धक्का लागला. त्यानंतर दुचाकीस्वराने चाकूने भोसकून कार चालकाची हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर कारचा दुचाकीला धक्का लागला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दुचाकीस्वराने चाकूने भोसकून कार चालकाची हत्या केली. ही हत्येची घटना सायंकाळी रविवारी ६ वाजण्याचा सुमारास घडली. या घटनेत झीशान शेख नावाच्या कार चालकाचा मृत्यू झाला आहे.

कार चालकाची हत्या झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या हत्येच्या घटनेनंतर आरोपी दुचाकीस्वारकाने पळ काढल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून पळून गेलेल्या आरोपी दुचाकीस्वाराचा शोध सुरु आहे. चालकाच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

पूर्व द्रुतगती मार्गावरील घाटकोपरजवळ दुचाकीस्वार आणि कार चालकात झालेल्या भांडणातून दुचाकीस्वाराने कार चालकाची हत्या केली आहे. झीशान शेख असे मृत कार चालकाचे नाव आहे. झीशान हा त्याच्या मित्रासह पूर्व दृतगती मार्गावरून कुरल्याच्या दिशेने जात होते. या वेळी घाटकोपरजवळ एक स्कूटीवरून चाललेल्या दुचाकीस्वाराला त्यांच्या गाडीचा धक्का लागला.

यावरून झालेल्या भांडणात दुचाकीस्वराने त्याच्या दुचाकीत ठेवलेला सुरा बाहेर काढला आणि झीशानच्या छातीत खुपसून त्याची हत्या केली. ही हत्या करून आरोपी दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याची नोंद करून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. या आरोपीचा शोध घेण्यासाठी उपायुक्तांनी दहा पोलीस पथके तयार केली आहे. पोलिसांनी या आरोपीचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT