Fire Breaks Out at Shiv Thakares Goregaon Home Saam
मुंबई/पुणे

बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग; अभिनेता नेमका कुठे होता? आगीचा VIDEO समोर

Fire Breaks Out at Shiv Thakare’s Goregaon Home: मराठी अभिनेता आणि बिग बॉस फेम शिव ठाकरे यांच्या गोरेगाव येथील घराला भीषण आग. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न. व्हिडिओ व्हायरल.

Bhagyashree Kamble

बिग बॉस मराठी फेम अन् मराठी कलाकार शिव ठाकरे याच्या घराला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील गोरेगाव येथील घरात आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिव ठाकरेला कोणतीही दुखापत झालेली नाही. परंतु घराला सर्वाधिक फटका बसला आहे. घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे घराचा बराचसा भाग भक्ष्यस्थानी आला आहे. शिव ठाकरेच्या घरातील फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगाव येथील शिव ठाकरे यांच्या घराला आग लागली आहे. आगीत घराचे मोठे नुकसान झाले आहे. या बातमीमुळे शिव यांचे चाहते चिंतेत पडले आहेत. बिग बॉस १६ चा स्पर्धक सुरक्षित आहे की नाही? असा प्रश्न सध्या व्हायरल व्हिडिओवरील कमेंटद्वारे चाहते विचारत आहेत.

शिव ठाकरे याचे घर गोरेगाव येथील कोलते पाटील वेर्वे इमारतीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरावरील आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, जेव्हा घराला आग लागली, तेव्हा शिव ठाकरे मुंबईत उपस्थित नव्हता.

शिव ठाकरे याच्या टीमनं अभिनेता सुखरूप असल्याची माहिती दिली आहे. मात्र, आगीमुळे घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. 'अभिनेता आता सुखरूप आहे. या भीषण दुर्घटनेत त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. किंवा इतर कुणाला या आगीमुळे दुखापत झाली नाही'. या माहितीनंतर चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

शिव ठाकरेच्या गोरेगाव येथील घराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओ अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या व्हिडिओत आगीमुळे घराचे प्रचंड नुकसान झाले असल्याचं दिसून येत आहे. शिव ठाकरेच्या टीमनं घटना घडल्यानंतर एक निवेदन जारी केलं आहे. 'आज सकाळी शिव ठाकरे याच्या मुंबईतील गोरेगाव येथील कोलते पाटी वेर्वे इमारतीतील खोलीत आग लागली. या आगीमुळे घराचे प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानीमुळे अभिनेत्याला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या दुर्घटनेच कोणतीही दुखापत झाली नाही'. आग लागण्यामागचं कारण समोर आले नाही. सध्या घराला आग नेमकी कशामुळे लागली? याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माघी गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ दर्शनासाठी गर्दी...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? पगार कितीने वाढणार? वाचा

Jalna : तलाठ्याला जालन्यात बेदम मारहाण, अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात कारवाईवेळी राडा

Mumbai Horror: मुंबईत माणुसकीचा कळस गाठणारी क्रूरता, अडीच महिन्याच्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

Weight Loss Tips: जीम किंवा डाएट न करताही अडीच महिन्यात कमी करू शकता 10 किलो वजन; डॉक्टरांनी सांगितले ३ सोपे उपाय

SCROLL FOR NEXT