Big update in Lalit Patil drug case Shocking information in police investigation Saam TV
मुंबई/पुणे

Lalit Patil Case: ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; पोलीस चौकशीत चक्रावून टाकणारी माहिती समोर

Lalit Patil Case Updates: ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक केल्यानंतर आता पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

Satish Daud

Lalit Patil Case Updates

ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक केल्यानंतर आता पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात अनेक बडे मासे गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ललित पाटील याने पोलीस चौकशीत आणखी एक मोठा खुलासा केला आहे.  (Latest Marathi News)

२०२१ पासून नाशिकच्या शिंदे गावात एमडीचं उत्पादन सुरू होतं. दर महिन्याला या ठिकाणाहून ५० किलो एमडीची निर्मिती केली जात होती. या एमडीचा सप्लाय मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकसह राज्यातील अन्य शहरांमध्ये केला जात होता, असं पोलीस चौकशीत समोर आलं आहे.

ड्रग पेडलर्सच्या नेटवर्कच्या मदतीने हा एमडीचा पुरवठा होत होता. यातून ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील दर महिन्याला तब्बल ५० लाख रुपयांचा नफा कमावत होते, असं पोलीस चौकशीत समोर आलं आहे. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात १६ आरोपींना अटक केली आहे. आणखी काहीजण पोलिसांच्या रडारवर आहेत.

ललित पाटील याच पैशाच्या जोरावर हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि पोलिसांना मॅनेज करत असल्याचं त्याच्या चौकशीतून उघड झालं आहे. ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांना तो सातत्याने पैसे देत होता. ललित पाटील ससून रुग्णालयातून ड्रग्ज सिंडिकेट चालवत होता आणि ससूनच्या बाहेर जाऊन बैठका घ्यायचा, अशी माहितीही ललितने पोलिसांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस आज पत्रकारपरिषदेत मोठा खुलासा करणार?

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात सरकारमधील दोन मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. नेमक्या याच विषयावर गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. आज देवेंद्र फडणवीस याबाबत पत्रकारपरिषद घेणार असून मोठा खुलासा करण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

SCROLL FOR NEXT